वाक्प्रचार 02Marathi Grammar - मराठी व्याकरण वाक्प्रचार 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. साधेल तेवढा स्वतःचा फायदा करून घेणे – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. चार पैसे गाठीला बांधणे. सोटेशाही चालवणे. आपल्या पोळीवर तूप ओढणे. 2. जीव वरखाली होणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे ? घाबरणे. आजारी असणे. उत्सुकता लागणे. राग येणे. 3. योग्य विधान निवडा. विधान 1) चतुर्भुज होणे या वाक्प्रचाराचा अर्थ लग्न करणे असा आहे. विधान 2) हात राखून जेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ खूप जेवणे असा आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर 4. वाटचाल करणे या अर्थाचा मराठीत कोणता वाक्प्रचार आहे ? तगादा लावणे. पिंक टाकणे कूच करणे. तजवीज करणे. 5. खालील वाक्य पूर्ण करा. गुन्हा कबूल न केल्यास पोलिस आरोपींना ………….. अन्नास लावतात. तिलांजली देतात. काकदृष्टीने पाहतात. चौदावे रत्न दाखवतात. 6. जीवाची मुंबई करणे या वाक्प्रचाराचा अर्थ ………… असा होतो. खूप कष्ट करणे. अतिशय चैन करणे. मुंबईला जाणे. स्वैर कल्पना करणे. 7. वड्याचे तेल वांग्यावर काढणे. – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. स्पष्टपणे नकार देणे. मनात संशय येणे. एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. एखादी गोष्ट मनाला लावून घेणे 8. योग्य पर्याय निवडा. नाकीनऊ येणे – मेटाकुटीला येणे. डोळे निवणे – डोळे दुखणे. जीवाचे रान करणे – मजामस्ती करणे. खडे फोडणे – कौतुक करणे. 9. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. कानाडोळा करणे दोष देणे. दुर्लक्ष करणे. लक्षपूर्वक काम करणे. आशा सोडणे. 10. चुकीचा पर्याय निवडा. दात धरणे – वैर बाळगणे. भान नसणे – ढोंग करणे. फाटे फोडणे – उगाच अडचणी निर्माण करणे. सर्व पर्याय योग्य आहेत. 11. मला कामातून अजिबात ………. भेटत नाही असे आई आजीला सांगत होती. – वाक्य पूर्ण करा. उसंत दक्षता ओनामा चाहूल 12. हात मारणे – या वाक्प्रचाराचा अर्थ ……….. असा आहे. भरपूर खाणे. चोप देणे. खूप कष्ट करणे. दानधर्म करणे. 13. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. भुकेने पोटात ……… ओरडत आहे असे सचिनने आईला सांगितले. कावळे पोपट बेडूक चिमण्या 14. साखर पेरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. शेतात ऊस लावणे. विनवणी करणे. गोड गोड बोलून आपलेसे करणे. खूप रागात बोलणे. 15. द्राविडी प्राणायाम करणे – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. जीवाची पर्वा न करणे. मनात पक्का विचार करणे. व्यायाम करणे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/11
9
13