वाक्प्रचार 02Marathi Grammar - मराठी व्याकरण वाक्प्रचार 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. द्राविडी प्राणायाम करणे – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. व्यायाम करणे. मनात पक्का विचार करणे. जीवाची पर्वा न करणे. 2. साखर पेरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. शेतात ऊस लावणे. गोड गोड बोलून आपलेसे करणे. विनवणी करणे. खूप रागात बोलणे. 3. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. भुकेने पोटात ……… ओरडत आहे असे सचिनने आईला सांगितले. चिमण्या कावळे पोपट बेडूक 4. जीवाची मुंबई करणे या वाक्प्रचाराचा अर्थ ………… असा होतो. अतिशय चैन करणे. मुंबईला जाणे. स्वैर कल्पना करणे. खूप कष्ट करणे. 5. जीव वरखाली होणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे ? आजारी असणे. राग येणे. उत्सुकता लागणे. घाबरणे. 6. योग्य विधान निवडा. विधान 1) चतुर्भुज होणे या वाक्प्रचाराचा अर्थ लग्न करणे असा आहे. विधान 2) हात राखून जेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ खूप जेवणे असा आहे. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर 7. मला कामातून अजिबात ………. भेटत नाही असे आई आजीला सांगत होती. – वाक्य पूर्ण करा. दक्षता उसंत ओनामा चाहूल 8. वड्याचे तेल वांग्यावर काढणे. – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. मनात संशय येणे. एखादी गोष्ट मनाला लावून घेणे स्पष्टपणे नकार देणे. एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. 9. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. कानाडोळा करणे दोष देणे. दुर्लक्ष करणे. लक्षपूर्वक काम करणे. आशा सोडणे. 10. खालील वाक्य पूर्ण करा. गुन्हा कबूल न केल्यास पोलिस आरोपींना ………….. तिलांजली देतात. चौदावे रत्न दाखवतात. अन्नास लावतात. काकदृष्टीने पाहतात. 11. वाटचाल करणे या अर्थाचा मराठीत कोणता वाक्प्रचार आहे ? तजवीज करणे. कूच करणे. तगादा लावणे. पिंक टाकणे 12. चुकीचा पर्याय निवडा. दात धरणे – वैर बाळगणे. भान नसणे – ढोंग करणे. सर्व पर्याय योग्य आहेत. फाटे फोडणे – उगाच अडचणी निर्माण करणे. 13. हात मारणे – या वाक्प्रचाराचा अर्थ ……….. असा आहे. चोप देणे. दानधर्म करणे. खूप कष्ट करणे. भरपूर खाणे. 14. साधेल तेवढा स्वतःचा फायदा करून घेणे – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. आपल्या पोळीवर तूप ओढणे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. चार पैसे गाठीला बांधणे. सोटेशाही चालवणे. 15. योग्य पर्याय निवडा. जीवाचे रान करणे – मजामस्ती करणे. डोळे निवणे – डोळे दुखणे. नाकीनऊ येणे – मेटाकुटीला येणे. खडे फोडणे – कौतुक करणे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/11
9
13