Free :

रांगेतील स्थान भाग 2

1. 6 जणांच्या रांगेत राम नीरज दिपक हे लगतचे शेजारी असून दिपकच्या डावीकडे कुणीही नाही नीरज हा केदारच्या डावीकडे चौथ्या क्रमांकावर आहे शांतनु रामचा शेजारी असून पवनच्या डावीकडे पहिल्या क्रमांकावर आहे तर नीरज च्या उजवीकडे 3रा कोण असेल ?

 
 
 
 

2. एका रांगेत यश समोरून 6 वा आणि शेवटून 11 वा आहे तर रांगेत एकूण मूले कीती ?

 
 
 
 

3. 7 मुलींच्या रांगेत स्नेहा प्रियंकाच्या लगेचच पुढे उभी आहे शीतल नीलमच्या जवळ उभी नाही पण माधुरीच्या लगेचच मागे उभी आहे. वेदांती सर्वात शेवटी उभी असून माधुरी तिच्यापासून 5 व्या क्रमांकावर आहे ऋतुजा आणि प्रियंकाच्या मध्ये एक मुलगी आहे तर समोरून नीलम कितव्या क्रमांकावर असेल ?

 
 
 
 

4. मुलींच्या एका रांगेत सीमा उजवीकडून तिसऱ्या क्रमांकावर आहे रांगेच्या मधोमध असणारी सानू आणि डावीकडून पाचव्या क्रमांकावर असणारी श्रेया यांच्यामध्ये 8 मूली आहेत तर सीमाचा डावीकडून कितवा क्रमांक असेल ?

 
 
 
 

5. मुलींच्या रांगेत ऐश्वर्या मध्यभागी बसलेली आहे तिच्या डावीकडे चौथ्या क्रमांकावर सोनल बसलेली आहे सोनलच्या डावीकडे कुणीही नसून उजवीकडे 8 व्या क्रमांकावर पल्लवी आहे तर पल्लवी रांगेच्या उजवीकडून कितव्या क्रमांकावर असेल ?

 
 
 
 

6. एका रांगेत साई समोरून 6 व्या क्रमांकावर उभा आहे रांगेत साईच्या पाठीमागे फक्त 3 मूले आहेत शेवटून 7 व्या क्रमांकावर वरद उभा आहे तर साई आणि वरद यांच्या मध्ये किती मूले असतील ?

 
 
 
 

7. 28 मुलांच्या रांगेत रोहन समोरून 13 व्या क्रमांकावर उभा आहे शेवटून 6 व्या क्रमांकावर पार्थ उभा असून तो अवधूत च्या मागे चौथ्या क्रमांकावर आहे तर अवधूत आणि रोहन च्या मध्ये किती मूले असतील ?

 
 
 
 

8. धावण्याच्या शर्यतीत आशा शेवटून 12 व्या क्रमांकावर आहे समोरून 3 री असणारी तेजा आणि आशाच्या मध्ये 7 स्पर्धक आहेत तर तेजाच्या मागे एकूण किती स्पर्धक असतील ?

 
 
 
 

9. उंचीप्रमाणे उभे राहिल्यास प्रीती रांगेच्या मध्यभागी येते अनु सगळ्यात छोटी असल्याने समोरून पहिल्या स्थानावर येते प्रेरणा राधिकापेक्षा लहान असून साधनाच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर येते साधना ही अनु आणि प्रीती च्या मधोमध येते तर सर्वाधिक उंच कोण ?

 
 
 
 

10. P Q R S T ह्या 5 जणांच्या रांगेत R आणि T हे एकमेकांचे शेजारी आहेत तर T च्या उजवीकडे 3 ऱ्या क्रमांकावर Q आहे S कोणाच्याही डावीकडे नाही तर दोन्ही टोकाला कोण असतील ?

 
 
 
 

11. 6 घरे एका रांगेत बांधली असून जोशी डावीकडून दूसरे आहेत पाटील जोशींच्या शेजारी असून त्यांच्या डावीकडे कुणीही नाही उजवीकडून चौथ्या क्रमांकावर कदम आहेत पवार हे कदम यांचे शेजारी नसून जाधव हे आठवले आणि पवार यांचे शेजारी आहेत तर पाटील यांच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर कोण असेल ?

 
 
 
 

12. एका रांगेत रेवतीचा डावीकडून 17 वा क्रमांक आहे सानिकाचा उजवीकडून 11 वा क्रमांक आहे सानिका रेवतीच्या उजवीकडे बसलेली आहे सानिका आणि रेवती या दोघींमध्ये 6 मुली बसलेल्या असतील तर रेवतीचे रांगेतील स्थान उजवीकडून कितवे असेल ?

 
 
 
 

13. एका रांगेत आर्यन शेवटून 11 वा आहे समोरून चौथ्या क्रमांकावर जयेश उभा असून त्याच्या आणि आर्यनच्या मध्ये 3 मूले आहेत तर रांगेत एकूण मूले किती ?

 
 
 
 

14. मुलांच्या एका रांगेत डावीकडून 3 ऱ्या क्रमांकावर स्वराज बसला आहे त्यानंतर लगेच 2 मूले सोडून कार्तिक बसला आहे कार्तिक उजवीकडून 5 व्या क्रमांकावर आहे तर रांगेत एकूण मूले किती असतील ?

 
 
 
 

15. एका रांगेत जान्हवी रामच्या पुढे चौथ्या क्रमांकावर आहे श्रेयस जान्हवीच्या मागे सातव्या क्रमांकावर असून रांगेच्या मधोमध उभा आहे तर राम मागून कितव्या क्रमांकावर असेल ?

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा

8 thoughts on “रांगेतील स्थान भाग 2”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!