Free :

[ 2023 ] Talathi Bharti All Information In Marathi | तलाठी भरती 2023

Latest Update – 

नुकतेच आदिवासी संख्या जास्त असणाऱ्या 11 जिल्ह्यांबाबत शासनाने निर्णय घेतला असून आता तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या भागात खालीलप्रमाणे पद भरले जाणार आहेत

All Important Points

Sr. NoPopulation of Scheduled TribesReservation for S.T. Candidates
150% and More100% for S.T. Candidates
225% to 50%50% for S.T. Candidates
325% and less25% for S.T. Candidates

Talathi Bharti 2023 –

Maharashtra Talathi Bharti 2023 is the recruitment drive for post name Talathi.

Talathi is a government official in Maharashtra, India, responsible for maintaining land records and revenue administration at the taluka level. They are appointed by the Revenue Department and supervised by the Tahsildar.

Talathi Bharti Notification – 

Official notification about Talathi Bharti is yet to be notified but as per the announcement by the government minister Maharashtra Talathi Recruitment process will be completed before August 2023.

Maharashtra Talathi Recruitment –

Due to some modification related to the roster of vacant posts. Talathi recruitment is currently on hold.

तलाठी भरती प्रक्रिया नुकतीच सुरू झाली होती परंतु 11 जिल्ह्यातील (  पेसा क्षेत्रात येणाऱ्या )  भरती प्रक्रिया बाबत  राज्य शासनाने  पदसंख्या भरण्याबाबत  न्यायालयीन मार्गदर्शन मागविल्यामुळे ही भरती प्रक्रिया सध्या लांबली आहे.  या जिल्ह्यातील पदसंख्या भरताना आदिवासी संख्येचा विचार करून  इतर उमेदवारांना यामध्ये संधी देता येईल का? याबाबतचा प्रश्न सुटल्यानंतरच ही भरती प्रक्रिया सुरू होईल.

The Talathi recruitment process was started recently but the recruitment process in 11 districts (falling under PESA area) has been delayed as the state government has sought judicial guidance on filling up the number of posts. While filling up the number of posts in these districts, considering the number of tribal candidates, can other candidates be given a chance is the current issue. This recruitment process will start only after this issue is resolved.

Talathi Bharti 2023 – General Information सामान्य माहिती

Talathi Vacancy 2023 : 4122 – 

As per the recent news published in the newspaper, a total 4122 posts of talathi will be recruited in the year 2023. 

 तलाठी पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

No.DivisionTotal Vacant Post
1Aurangabad847
2Nashik1035
3Kokan731
4Nagpur580
5Amarawati183
6Pune746
Grand Total4122

Talathi Bharti Eligibility – 

Thas eligibility norms are divided in the following points –

Age Limit for Talathi Recruitment : वयोमर्यादा –

तलाठी पदाची जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.

For General Category : 19 to 38 years

For Reserved Category : 19 to 43 Years

For Special Reservation Category : 19 to 45 Years

मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 38 वर्ष अशी राहील. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 43 वर्ष आहे. प्रक्षेपित/भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 18 ते 45 वर्ष आहे.

Talathi Pay Scale / Salary – तलाठी वेतन श्रेणी 

Rs, 5,200/- to Rs. 20,200/-

Talathi Bharti qualification : शैक्षणिक पात्रता –

तलाठी पदासाठी संवैधानिक विद्यापीठाची पदवी उमेदवाराने धारण करणे आवश्यक असते. तसेच शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.

संगणक विषयी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत ती अहर्ता प्राप्त करणे आवश्यक राहील.

Application Fees For Talathi Exam : अर्ज करण्यासाठी शुल्क – 

For General Category :  500 रुपये

For Reserved Category : 350 रुपये

How to apply for Talathi Recruitment : अर्ज करण्याची पद्धत –

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जदाराचे स्वतःचे email accountआवश्यक आहे.

अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit बटणावर क्लिक करावे.अर्जाची प्रत आपल्या email वर प्राप्त होते.

Talathi Bharti Selection Process : निवडीची प्रक्रिया –

Talathi Bharti Selection Process : उमेदवाराची निवड कशी होते –

जिल्हानिवड समितीमार्फत तलाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाते.प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती कार्य करते.

निवड समितीतर्फे तलाठी या ‘गट – क’ संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात. परीक्षेसाठी पात्र असलेले उमेदवार अर्ज करतात.

त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते. त्यातून प्रत्येक जास्तीत जास्त मार्क असणाऱ्या उमेदवारांची मेरीट लिस्ट लागते. प्रत्येक जिल्ह्यानुसार मेरीट लिस्ट हे वेगवेगळी लागते.

Talathi Merit List : मेरिट लिस्ट कशी लावली जाते? –

तलाठी पदासाठी गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी एकूण गुणांच्या 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ठरलेल्या जागेनुसार मेरिट लिस्ट लागते.

लेखी परीक्षा –

Talathi Bharti Exam Syllabus – परीक्षेचा अभ्यासक्रम –

NoSubjectsQuestionsMarks
1Marathi Language2550
2General Knowledge2550
3Intelligence Test2550
4English Language2550
Total100200

तलाठी पदासाठीची लेखी परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. 100 प्रश्नांना प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे एकूण 200 गुण असतील. परीक्षेसाठीचा कालावधी दोन तासाचा असेल.

Talathi Bharti Marathi Syllabus :  तलाठी मराठी विषयाचा अभ्यासक्रम –

तलाठी परीक्षेमध्ये मराठी या विषयाचे एकूण 25 प्रश्न असतात आणि त्यासाठी 50 गुण असतात.

मराठी विषयाच्या पेपरचा दर्जा हा बारावीपर्यंतचा असतो.

व्याकरणातील समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, क्रियापद,विशेषण,विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द इत्यादी घटकांवर प्रश्न विचारले जातात.

मराठी या विषयाची तयारी करण्यासाठी मो. रा. वाळंबे सरांचे पुस्तक तसेच बाळासाहेब शिंदे सर यांचे पुस्तक उपयोगी आहे. त्याचबरोबर ऑनलाइन देखील अनेक प्रश्न उपलब्ध आहेत.

Talathi Bharti English Syllabus :  तलाठी इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम –

‘इंग्रजी’ या विषयासाठी देखील 25 प्रश्न संख्या व 50 गुण असतात.

इंग्रजी विषयाच्या प्रश्नांचा दर्जा हा पदवीपर्यंतचा असतो.

Vocabulary, synonyms and antonyms, proverbs, tense and kinds of tense, question tag, use  proper form of verb, spot the error,verbal comprehension passage, spellings,sentence structure, one word substitution phrases etc..इंग्रजी विषयांमध्ये या घटकांवर प्रश्न विचारले जातात. 

Talathi Bharti General Knowledge Syllabus : तलाठी सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम –

‘सामान्य ज्ञान’ या विषयांमध्ये महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायत राज व राज्यघटना, भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र, चालू घडामोडी ( चालू घडामोडीचा अभ्यास असा करा ) महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य भारताच्या शेजारील इतर देश आणि विषयी माहिती इत्यादी अनेक घटकावर प्रश्न विचारले जातात.

या विषयाचे देखील 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतात आणि या प्रश्नांचा दर्जा पदवी पर्यंतचा असतो.

यासाठी एकनाथ पाटील सरांचा ठोकळा अतिशय उपयोगी आहे.

Talathi Bharti Intelligence Test Syllabus : तलाठी बौद्धिक क्षमता विषयाचा अभ्यासक्रम  –

अंकगणित आणि बुद्धिमत्ता मिळून 25 प्रश्न 50 गुणासाठी असतात.

तलाठी गणित –

 ‘अंकगणित’ यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ काम व वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन मापनाची परिमाणे, घड्याळ यांवर प्रश्न विचारले जातात.

Maha Bharti या ग्रुपवर घेतले जाणारे गणिताचे प्रश्न रोजच्या रोज सोडवले तर खूप जास्त अभ्यास करण्याची गरजच उरत नाही.त्यांनी प्रश्न खूप अप्रतिम रित्या उत्कृष्टरित्या सोडून दाखविले आहेत.

गणित विषयाची तयारी कशी करावी?

तलाठी बुद्धिमत्ता चाचणी –

       बुद्धिमत्ता यामध्ये अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे समसंबंध, अंक अक्षर आकृत्या, वाक्यावरुन निष्कर्ष, वेनँआकृती इत्यादी घटकांवर प्रश्न विचारले जातात.

गुण देण्याची पद्धत

या परीक्षेमध्ये नकारात्मक गुणपद्धती लागू नाही. प्रत्येक एका प्रश्नासाठी दोन गुण मिळतात. असे एकूण 100 प्रश्नाला 200 गुण असतात.

प्रश्नाची काठिण्य पातळी कशी असते?

तलाठी परीक्षेमधील प्रश्नांची काठिण्य पातळी ही समसमान असते.

सामान्य विद्यार्थी ते हुशार विद्यार्थी असा विचार करून प्रश्न तयार केले जातात.

काही प्रश्न हे खूप सोपे असतात तर काही प्रश्नांसाठी चांगला अभ्यास करावा लागतो व त्यातूनच मेरीट लिस्ट तयार होते.

Talathi Bharti Exam Preparation Tips 2023 : तयारी कशी करावी?

  1. या परीक्षेची तयारी करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाठीमागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे आणि मागील प्रश्नांचे विश्लेषण करणे.
  2. तलाठी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता यांसारखे प्रश्न अवघड वाटतात.
  3. परंतु त्याचा जास्तीत जास्त सराव केल्यास पैकीच्या पैकी मार्क मिळवता येतात.
  4. या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान या घटकाची व्याप्ती भरपूर आहे.
  5. यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, चालू घडामोडी, महाराष्ट्रातील समाज सुधारक, महाराष्ट्र विषयक सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे अशा अनेक विषयांचा समावेश होतो.
  6. तलाठी भरती परीक्षेची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे यासाठी इयत्ता पाचवी ते बारावी पासून चे क्रमिक पुस्तके वाचली पाहिजेत. त्याचा चांगला अभ्यास केला पाहिजे. तरच यात यश मिळवता येईल.

Talathi Bharti Online Practice Test / Exam

खालील बटनावर क्लिक करून तुम्ही फ्री सराव संच सोडवू शकतात

Talathi Bharti 2023 Important Dates : महत्वाच्या तारखा –

Application / Registration Start DateMay 2023 ( Tentative )
Application / Registration End DateMay 2023 ( Tentative )
Admit Card will be Available onwill be updated soon
Talathi Bharti 2023 Result Datewill be updated soon

Documents for Talathi Bharti 2023 | तलाठी भरती आवश्यक कागदपत्रे

Sr.NoLevelDocuments Required
1General DocumentsLeaving Certificate
Domicile Certificate
Nationality Certificate
EWS Certificate ( if comes under EWS Quota )
Cast Certificate  ( if comes under Reservation Quota ) 
Non-Creamy Layer Certificate  ( if comes under Reservation Quota )
Income Certificate  ( if comes under Reservation Quota )
210thPassing Certificate
Mark Memo
312thPassing Certificate
Mark Memo
4GraduationPassing Certificate
Mark Memo
Degree Certificate
5Post Graduation ( If have any)Passing Certificate
Mark Memo
Degree Certificate
6Computer LiteracyMS-CIT or
CCC o
rAny other equivalent certificate showing computer literacy

Talathi 2023 Application Opened on : अर्ज स्विकारण्याची सुरुवात – 

तलाठी भरती प्रक्रिया नुकतीच सुरू झाली होती परंतु 11 जिल्ह्यातील (  पेसा क्षेत्रात येणाऱ्या )  भरती प्रक्रिया बाबत  राज्य शासनाने  पदसंख्या भरण्याबाबत  न्यायालयीन मार्गदर्शन मागविल्यामुळे ही भरती प्रक्रिया सध्या लांबली आहे.  या जिल्ह्यातील पदसंख्या भरताना आदिवासी संख्येचा विचार करून इतर उमेदवारांना यामध्ये संधी देता येईल का? याबाबतचा प्रश्न सुटल्यानंतरच ही भरती प्रक्रिया सुरू होईल.

Talathi Bharti 2023 Online Form Start Date :  तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख

will be updated soon

Talathi Bharti Admit Card – प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची तारीख –

will be updated soon

Talathi Exam Date : तलाठी परीक्षेचा दिनांक – 

will be updated soon

Talathi Exam Result : निकालाची तारीख –

will be updated soon

Read More :

  1. गणित विषयाची तयारी कशी करावी ?
  2. चालू घडामोडी विषयाची तयारी कशी करावी ?
  3. अभ्यासाचे वेळापत्रक कसे तयार करायचे ?

मित्रांनो, तलाठी भरती प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती देणारे हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला आणखी काय माहिती हवी हे मला कमेंट मध्ये नक्की विचारा.

2 thoughts on “[ 2023 ] Talathi Bharti All Information In Marathi | तलाठी भरती 2023”

  1. पंकज लेव्हरकर

    सर
    तलाठी मध्ये मेडिकल टेष्ठ आहे काय

  2. Sti post sathi pn ashich mahiti…book list…syllbus…and …exam pattern for 2024…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!