Current affairs in Marathi : This article will help you to identify the important things to study in current affairs. Do’s of studying current affairs and Don’ts of studying Current affairs. The article is written in Marathi.
All Important Points
प्रमोदने चालू घडामोडी [ Current Affairs ] चा अभ्यास करण्यासाठी हातामधे एक मासिक घेतले असता – 2020 मध्ये फोर्ब्स ने जाहीर केलेल्या 100 सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची बातमी त्याच्या वाचनात आली.
आणि ही बातमी बघून त्याला एकदम टेन्शन झाले. कारण या बातमीमध्ये जगातील एक नाही तर 100 खेळाडूंची नावे होती.
इतकी नावे कशी लक्षात ठेवायची? म्हणून त्याने ती बातमी सोडून दिली.
त्यानंतर त्याचे लक्ष गेले ते – जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी. टेबल मध्ये दिलेले इतके सगळे विद्यापीठांची नावे, त्यांचे देश. कोणते विद्यापीठ कोणत्या देशाचे हे कसे लक्षात राहील?
मग पुन्हा हे सुद्धा एक कठीण काम वाटल्यामुळे त्याने हीसुद्धा बातमी सोडून दिली.
प्रमोद ने शेवटी सोप्या बातम्या वाचू असं ठरवलं – आणि देशातील बदलेल्या गव्हर्नर ची यादी समोर आली.
आत्ताच तर पाठ केले होते सर्व.. पुन्हा का बदलले?
आता पुन्हा सर्व पाठ केले तर गोंधळ होईल. कारण काही राज्याचे गव्हर्नर इकडचे बदलून त्या राज्याला गेले होते आणि काही गव्हर्नर त्या राज्याकडून नवीन राज्याकडे आले होते.
हे सर्व लक्षात ठेवणे निश्चितच खूप कठीण होते आणि म्हणून त्याने हातातील मासिक ठेवून दिले.
चालू घडामोडीचा अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी
प्रमोद सारखे असे खूप मित्र आहेत ज्यांना अभ्यास करताना काही अडचण येते.
अभ्यास करताना सर्व म्हणतात की चालू घडामोडी [ Current Affairs ] सोपा विषय आहे – थोडासा अभ्यास केला तर पैकीच्या पैकी मार्क मिळतील.
पण मग नेमका अभ्यास कसा करायचा? [ How to Study Current affairs in Marathi? ] मासिक बघितले तर चक्कर यायला वेळ लागणार नाही.
चालू घडामोडी [ Current Affairs ] या विषयाचा अभ्यास करण्यासाठी सातत्य ही गोष्ट महत्त्वाची आहे.
योग्य आणि नियमित तयारी असेल तर हा विषय परीक्षेत पैकीच्या पैकी गुण ही मिळवून देवू शकतो.
पण मग अभ्यास करताना सातत्य ठेवणे म्हणजे काय? आणि योग्य अभ्यास करणे म्हणजे नेमका कसा अभ्यास करायचा? पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवायचे?
या सर्व गोष्टी आपण आजच्या आर्टिकल मध्ये बघू
चालू घडामोडी [ Current Affairs ] या विषयाचा आवाका फार मोठा आहे. काही सांगतात वर्तमानपत्र वाचा. काही सांगतात – मासिक वाचा. काही सांगतात रोज बातम्या बघा.
रोज उपलब्ध होणारी चार-पाच वर्तमानपत्रे, दिवसभर चालू असणाऱ्या बातम्या, मार्केटमध्ये रॅक भरून असणारे चालू घडामोडी [ Current Affairs ] चे मासिके – हे सर्व बघून
काय वाचावे अन काय सोडावे ?
या संभ्रमात परीक्षा देणारा प्रत्येक उमेदवार असतो.
म्हणून हे सर्व कम्प्युजन दूर करण्यासाठी आजच्या आर्टिकल मध्ये आपण बघू की – चालू घडामोडी [ Current Affairs ] चा अभ्यास करण्यासाठी नेमका कोणत्या गोष्टीवर भर द्यायला पाहिजे? [ How to Study Current affairs in Marathi? ]
अभ्यास करताना नेमकं काय करायला पाहिजे म्हणजे त्याला टेन्शनही येणार नाही, आपला वेळ वाचेल आणि काय करायला नाही पाहिजे?
चालू घडामोडी या विषयात नेमके काय महत्वाचे असते? Important things while doing study of Current Affairs
हा विषय तसा खूप मोठा आहे. वर्ग 4 च्या परीक्षेपासून ते वर्ग-1च्या स्पर्धा परीक्षा साठी या विषयावरती प्रश्न विचारले जातात. या विषयाचा अभ्यास करताना आपण कोणत्या पोस्टसाठी तयारी करत आहोत याचा विचार करून अभ्यास करायला पाहिजे.
2011 ची जनगणनेची आकडेवारी खूप मोठी आहे. पण जर तुम्ही पोलीस भरती किंवा तलाठी यासारख्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर सर्वच लक्षात ठेवण्याची गरज नाही.
म्हणून नेमके यात काय महत्त्वाचे आहे ते बघू –
- नुकत्याच झालेल्या महत्वाच्या नेमणुका
- Awards -राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे पुरस्कार,
- क्रीडा क्षेत्र – मोठ्या स्पर्धा, विश्वचषक खेळाडूंनी जिंकलेले पदक
- संरक्षण क्षेत्र – झालेले युद्ध सराव, विकसित केलेले शस्त्र अस्त्र, इतर देशांशी झालेला करार
- चर्चेत असणारे व्यक्ती
- चर्चेतील क्षेत्र
- चर्चेतील देश
- दोन देशांतील करार
- राजकीय घडामोडी
- आर्थिक घडामोडी
- आंतररष्ट्रीय घडामोडी
- निवडणुका
- विज्ञान – तंत्रज्ञान
- व्यापार
- Govt. Schemes
- महत्वाच्या बैठका/समिती
- महत्वाचे दिवस
- महत्वाच्या व्यक्तीं ( निधन वार्ता)
- नैसर्गिक आपत्ती विषयक घडामोडी
- रँकिंग
- पुस्तक आणि लेखक(नुकतेच प्रकाशित झालेले)
महत्वाचे
वरती दिलेल्या सूची प्रमाणे आपण न्यूज एका ठिकाणी संकलित केल्या तर आपल्याला अभ्यासाला खूप सोपे जाते. जसे की एका ठराविक महिन्याच्या
आंतरराष्ट्रीय घडामोडी एका ठिकाणी, महत्वाचे दिवस एका पेजवर, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी,देशा- देशांतील करार, अशा काही बाबी आपण एका ठिकाणी आणि विभागून केल्या तर रीविजन साठी सोपे जाते.
आता नेमका काय अभ्यास करायचा आहे हे समजले. पण तरीही अशा काही गोष्टी असतात ज्या उमेदवार अभ्यास करताना चुकीच्या करतात.
म्हणजे एखाद्या कमी महत्त्वाच्या घटकाला जास्त वेळ देणे किंवा एखादी गोष्ट महत्त्वाची आहे परंतु समजत नाही म्हणून सोडून देणे.
म्हणून चालू घडामोडी [ Current Affairs ] चा अभ्यास करत असताना काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हेही बघणे गरजेचे आहे.
चालू घडामोडी चा अभ्यास करताना काय करायला पाहिजे? Do’s of Studying Current Affairs in Marathi
काही वेळा खूप मेहनत करून ही अपेक्षित स्कोअर आपण या विषयात करू शकत नाही.या विषयात चांगले मार्क्स मिळवायचे असल्यास आपल्याला खालील गोष्टींचा विचार करावा लागेल.
खाली काही मुद्दे दिले आहेत जे अभ्यास करताना आपल्याला मदत करतील.
चालू घडामोडी [ Current Affairs ] हा विषय खूप मोठा आहे.आणि इतर विषया प्रमाणे आपण एका ठराविक वेळेत याचा अभ्यास पूर्ण करू शकत नाही या विषयासाठी आपल्याला आपल्या रोजच्या वेळापत्रकातून काही वेळ काढावाच लागेल.
नियमित वृत्तपत्र / बातम्या बघणे [ Reading newspaper on a daily basis ]
- नियमित वृत्तपत्र वाचनाची सवय आपल्याला लागायला हवी. आजच्या दिवसभरातील घडामोडी आपण आजच वाचायला हव्या.
- आपल्या अभ्यासाच्या नियोजनात आपण चालुघडामोडी रोजच्या रोज करायच्या ठरवतो. परंतु ठरवणे सोपे आहे रोज करणे अवघड आहे.
- नेमके काय होते? – बऱ्याचदा आपण महिनाच्या सुरुवातीला एक दोन दिवस नियमित बातम्यांचे वाचन करतो आणि नंतर पुन्हा कधीतरी वाचू असे म्हणतो.
- उद्यापासून सुरुवात करू, आजचा दिवस जाऊ दे. असा विचार करत बराच काळ निघून जातो
- पुढे ढकलत सगळा महिना निघून जातो आणि महिन्याच्या शेवटी जास्त वेळ देऊन आपण राहिलेल्या गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करतो ज्या की वाचायला सोप्या असतात पण लक्षात ठेवायला तितक्याच कठीण.
- म्हणून चालू घडामोडी [ Current Affairs ] चा सर्व अभ्यास एका वेळी न करता रोजच्या रोज बातम्यांचे वाचन करण्याचा प्रयत्न करावा.
मासिक वाचन [ Read Current Affairs Magazine in Marathi ]
- महिन्याच्या शेवटी येणारे कुठलेही चांगल्या प्रकाशनाचे मासिक आपण वाचायला हवे.
- आपण नियमितपणे बातम्यांचे वाचन केलेले असेल तर मासिक वाचताना बऱ्याच गोष्टी ओळखीच्या वाटतात
- शिवाय मासिक वाचनातून आपली रिविजनही होते आणि काही महत्वाच्या पण आपल्या वाचनात न आलेल्या घडामोडींचा अभ्यासही होतो.
- परंतु दररोजच्या बातम्या दररोज न करता जर तुम्ही महिन्याच्या शेवटी आलेले मासिक वाचायला घेतले तर ते खूप अवघड होऊन जाईल कारण तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट नवीन असेल.
- तीन चार वेगवेगळी मासिके वाचण्याची गरज नाही तुम्ही मोठ्या पोस्ट ची तयारी करत असाल तर वेगवेगळ्या मासिकातून अभ्यास केला तर ठीक आहे परंतु वर्ग-3 व वर्ग-4 दर्जाच्या पोस्टसाठी एकाच मासिकाचा अभ्यास केला तरी पुरेसा आहे.
या घटकावर परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप पाहणे [ Question analysis ]
- परीक्षेत चालू घडामोडी [ Current Affairs ] वर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात या साठी प्रश्नांचे स्वरूप पाहणे गरजेचे आहे.
- मागील वर्षांच्या काही प्रश्न पत्रिकांचा आढावा घेतल्यास आपल्याला प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेता येईल.
- कुठल्या क्षेत्रातील घडामोडींना कसे प्रश्न विचारले जातात याची आपल्याला कल्पना येते.
- उदाहरणार्थ. तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती यासारख्या परीक्षांना भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान झालेल्या युद्ध सरावाचे नाव विचारले जाते परंतु हाच प्रश्न पीएसआय एसटीआय असिस्टंट साठी विचारला असेल तर त्यामध्ये हा सराव कुठे झाला? या सरावाची थीम काय होती यासारखे ही प्रश्न विचारले जातात.
- त्यामुळे फक्त बातमी न वाचता, त्या बातमीतून काय काय विचारले जाऊ शकते हे लक्षात येण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतून प्रश्नांचे स्वरूप माहीत करून घेणे गरजेचे आहे.
जर तुम्ही पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक या सारख्या परीक्षांची तयारी करत असाल तर चालू घडामोडीच्या फ्री टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून भरपूर टेस्ट सोडवा :
स्वलिखित नोट्स [ Prepare your notes for Current affairs ]
- चालू घडामोडी [ Current Affairs in Marathi ] च्या नोट्स काढायला पाहिजे की नाही ? याबद्दल वेगवेगळे मत आहे. काहीना वाचलेले लक्षात राहते परंतु मित्रांसाठी नोट्स काढणे हा चांगला पर्याय आहे.
- महत्वाच्या असणाऱ्या घडामोडी आपण लिहून घेतल्या पाहिजे याचा फायदा असा होतो की आधीच्या news चा तशा प्रकारच्या आलेल्या नंतरच्या news शी संदर्भ लावता येतो आणि ती घटना आपल्याला पक्की लक्षात राहते.
- बऱ्याचदा परीक्षेत आपण आपल्या नोट्स मध्ये कुठे काय लिहून ठेवले आहे हे देखील आठवते.
- त्याच बरोबर Revision करण्यासाठी आपल्याला स्वलिखीत नोट्स चा खूप फायदा होतो.
चालू घडामोडीचा अभ्यास करताना काय करायला नको? Don’ts of studying Current Affairs in Marathi
आपल्याला परीक्षेत चांगले मार्क्स मिळवायचे असल्यास आपण कोणत्या गोष्टी कराव्या याच्या नेहमीच शोधात असतो.पण त्याच बरोबर आपण कोणत्या गोष्टी टाळायला हव्या याचाही विचार करायला हवा.कारण बऱ्याचदा महत्वाच्या नसलेल्या गोष्टी वर ही आपला भरपूर वेळ खर्च होतो आणि जे करायचे आहे त्यासाठी वेळ अपुरा पडतो.
आपण खालील गोष्टीं टाळल्या तर आपल्याला कमी वेळेत या विषयात चांगले मार्क्स मिळवता येतील.
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या नसलेल्या बातम्यांचे वाचन करत बसणे. Focus on unimportant News
- वृत्तपत्रात सर्वच प्रकारच्या बातम्या आलेल्या असतात.त्यातील सर्वच बातम्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या नसतात.
- आपण पेपर वाचायला घेतला की महत्वाचे विषय सोडून इतर बातम्या ही आपल्याला वाचाव्या वाटतात.
- उदाहरणार्थ – बॉलीवूड च्या बातम्या, दोन राजकारण्यांमध्ये चालणारे शाब्दिक युद्ध, चर्चेत असणारा एखादा तात्पुरता मुद्दा जसे की एखाद्या कंपनीने चालवलेल्या फसवणुकीचे स्टिंग ऑपरेशन.
- या सर्व गोष्टी रंजक असतात आणि म्हणून वाचायलाही आवडतात परंतु परीक्षेच्या दृष्टीने याचा काही फायदा नसतो.
- आणि ज्या गोष्टींवर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या बातम्या आपल्याला किचकट आणि कंटाळवाण्या वाटायला लागतात.
- उदा. पर्यावरणासंदर्भात चाललेली जागतिक स्तरावरील बैठक आपल्याला किचकट आणि कंटाळवाणी वाटते – कारण तो पर्यावरणाचा करार का करायचा? कोण त्याला विरोध करत आहे यात कोणाचे नुकसान आहे या गोष्टी सुरुवातीला इंटरेस्टींग वाटत नाही परंतु परीक्षेच्या दृष्टीने यात गोष्टी महत्त्वाच्या आहे.
- म्हणून जो पर्यंत आपण परीक्षार्थी आहोत तो पर्यंत अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या साठी उपयुक्त बातम्यांचे वाचन करावे.
- आणि काय वाचायचे किंवा काय वाचू नये हे ठरवण्यासाठी वरती दिलेली लिस्ट महत्त्वाची आहे.वरती दिलेल्या सूचित ती बातमी बसते की नाही हे तपासून पाहावे.
माहिती पाठ करणे- Mugging Up Data
- रोजच्या रोज बातम्यांचे वाचन न करता आपण महिन्याच्या शेवटी मासिक घेवून बसतो आणि आता हे पाठ करून टाकू असा मनोमन निर्धार करतो.जे की योग्य ही नसते आणि शक्यही नसते.
- पाठ केलेल्या माहितीच्या आधारे परीक्षेत उत्तर आठवेलच याची काही शाश्वती नसते.
- याउलट रोजची सवय असेल तर आपल्याला त्या बातम्या परिचयाच्या असतात आणि पाठ वगैरे करण्याची गरज नसते.
- हातात घेतलेल्या मासिकातून सर्व माहिती पाठ करणे हे खूप कठीण काम आहे.
- परंतु अभ्यासाची सुरुवात करताना काय लक्षात ठेवायचे आणि कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचे नाही हे समजत नसल्यामुळे आपण आपला बराचसा वेळ गरजेची नसणारी माहिती पाठ करण्यात घालवतो.
काही बातम्यांना गरजेहून अधिक महत्त्व देणे –
- वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांना केंद्रस्थानी ठेवून दिलेल्या नसतात त्यांचा मूळ वाचक वर्ग ही सर्वसामान्य जनता असते. त्यामुळे सर्वांना रुची वाटेल अशा बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जात असतात
- आणि वाचक वर्गाच्या रुचीला लक्षात ठेवून एखादी बातमी केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण वर्तमानपत्र त्याभोवती फिरत असते
- परंतु ही गोष्ट जर लक्षात घेतली नाही तर आपला बराचसा वेळ हा अशा परीक्षेच्या दृष्टीने अनावश्यक बातम्यांच्या अभ्यासात जातो.
- याचे उदाहरण म्हणून आपण सध्या चालू असणारे कोरोना प्रकरण घेऊ. वरती सूचीमध्ये सांगितल्याप्रमाणे आपत्ती विषयक घडामोडी महत्वाच्या असतात. पण त्याला ही काही मर्यादा असतात.सध्या जगभर थैमान घालणारा कोरोना या आजाराबद्दल वृत्तपत्रात भरपूर बातम्या येतात.
- पण आपल्यासाठी फक्त तो आजार कुठून आला, त्याचा प्रसार कसा होतो, त्याचे नाव, त्याने प्रभावित झालेले देश. आणि त्याबद्दल चालू असणारे महत्त्वाचे संशोधन इतक्याच बाबी महत्त्वाच्या आहेत
- .वृत्तपत्रात छापून आल्याप्रमाणे कुठे किती रुग्ण सापडले, कोणी कोणावर काय टिप्पणी केली या गोष्टीही परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या नसतात. त्या शक्यतो टाळाव्या.
केवळ प्रश्न उत्तर वाचन करणे
- चालू घडामोडी [ Current Affairs in Marathi ] चा अभ्यास करताना उमेदवारांमध्ये सर्वात नुकसान करणारी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे चालू घडामोडी [ Current Affairs ] चा अभ्यास फक्त प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून करणे ही होय.
- ही सवय आपल्याला महागात पडू शकते.मासिक किंवा इंटरनेट वर असलेल्या फक्त प्रश्नांचा सराव केल्याने, केवळ प्रश्न उत्तर वाचल्याने आपल्याला त्या विषयाचे फक्त प्रश्ना पुरते ज्ञान असते.आणि परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असल्याने प्रश्नात दिलेले सर्वच पर्याय ओळखीचे वाटतात.आणि आपला गोंधळ होतो. आणि जसाच तसा प्रश्न परीक्षेत पडेलच याची खात्री नसते.
- प्रश्न थोडा बदल करून विचारला तर माहीत असूनही आपण त्याचे उत्तर काय द्यावे. या संभ्रमात असतो.
स्मरण आणि विस्मरण
- प्रश्न आणि उत्तर या प्रकारात चालू घडामोडी [ Current Affairs ] चा अभ्यास केला तर आपल्याला त्या गोष्टी काही दिवसांपर्यंत लक्षात राहू शकतात. कारण प्रश्न उत्तर स्वरूपात लक्षात ठेवलेल्या गोष्टी आपल्या टेम्पररी मेमरी मध्ये साठवल्या जातात.
- परीक्षेत या टेम्पररी मेमरी मधून प्रश्नाचे उत्तर आठवण्याचे प्रमाण खूप कमी असते
- जोपर्यंत विषय काय आहे हे समजत नाही तोपर्यंत ची गोष्ट आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहणार नाही.
- प्रश्न उत्तर याच्या साह्याने चालू घडामोडी [ Current Affairs ] चा केलेला अभ्यास म्हणजे तात्पुरते सुख होय.
- आपण प्रश्न उत्तर वाचतो आणि ते लक्षात आहे की नाही हे बघण्यासाठी प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपण फक्त टेम्पररी मेमरी च्या साह्याने उत्तर देत असतो.
- असे उत्तर देता आल्याने उमेदवारांना तात्पुरते समाधान मिळते
- परंतु जर ती संकल्पना आपल्या दीर्घकाळ टिकणाऱ्या मेमरी मध्ये गेली नसेल असेल तर परीक्षेत ते आपल्याला आठवत नाही.
- म्हणून फक्त प्रश्न आणि उत्तर यावर भर न देता सर्वात आधी संबंधित बातमी तुमच्याकडे असणाऱ्या मासिक वर्तमानपत्र यातून समजून घ्यायला हवी आणि त्यानंतर रिविजन करण्यासाठी प्रश्न उत्तर या पद्धतीचा उपयोग करायला हवा.
अधिक वाचा :
- How to Study Maths? [ स्पर्धा परीक्षेसाठी गणिताचा अभ्यास कसा करायचा ? ]
- How To Prepare Study Plan ? [ अभ्यासाचे वेळापत्रक कसे तयार करायचे ? ]
तर अशा पदधतीने आपण चालू घडामोडी या विषयाचा [Study Current affairs in Marathi ]अभ्यास करू शकतो.
चालू घडामोडी [ Current Affairs ] चा अभ्यास करण्यासाठी आपल्याला भरपूर वर्तमानपत्र भरपूर मासिके उपलब्ध आहेत.
तुम्ही तुमचा चालू घडामोडी [ Current Affairs ] चा अभ्यास कोणत्या मासिकातून करता हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा.
रोजगार नोकरी संदर्भ,
How to be in link with this study also having to difficult to read and remind the all thing . I am preparing for police bharti 2020 so suggest me the exact collection to read . Plz help me I don’t want miss this chance cause I am 32 yrs old man. This is last chance of my life