Free :

How to Study Maths? [ स्पर्धा परीक्षेसाठी गणिताचा अभ्यास कसा करायचा ? ]

How to Study Maths? [ स्पर्धा परीक्षेसाठी गणिताचा अभ्यास कसा करायचा ? ]

तयारी करणाऱ्या उमेदवारांना सतावणारा एक विषय आहे तो म्हणजे गणित! 

हे माझे स्वतःचे मत नाही हे मत आहे 4938 मित्रांचे ज्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता की – 

मागच्या वर्षी कोणत्या विषयात कमी मार्क मिळाल्यामुळे तुम्हाला यश मिळाले नाही?

यावरती चोवीस तासाच्या आत 4938 उमेदवारांनी आपले मत व्यक्त केले आणि

यामध्ये 46% उमेदवारांना असे वाटते की – गणित विषयात कमी मार्क्स मिळाल्यामुळे त्यांना यश मिळाले नाही.

मित्रांनो खरंच गणित हा विषय इतका अवघड आहे का? गणित या विषयामुळे तुमचे पोस्ट मिळवण्याचे स्वप्न अपूर्ण राहू शकते का? मग ह्या अवघड विषयाचा अभ्यास कसा करायला पाहिजे? अशा कोणत्या गोष्टी आहेत जे यश मिळवणारे मित्र करतात म्हणून त्यांचे सिलेक्शन होते?

आजच्या आर्टिकल मध्ये वरील सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्याच बरोबर गणिताचा अभ्यास नेमका कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

त्याआधी एकदा त्या घेण्यात आलेल्या पोलचा काय अर्थ होतो? हे बघू

गणितामुळे अपयश आले हे सांगणारा POLL :

60000 पेक्षा जास्त सदस्य संख्या असणाऱ्या Telegram Channel वर या पोल चे आयोजन करण्यात आले होते. पोल मध्ये भाग घेतलेल्या 4938 सदस्यांचे मत मात्र खरच विचार करायला लावणारे आहे

how-to-study-mathematics-poll

पोल मधून निघणारे निष्कर्ष : 

  1. 46% उमेदवारांचे सिलेक्शन फक्त गणित विषयामुळे होऊ शकले नाही.
  2. म्हणजे अपयश येण्याचे मुख्य कारण गणित विषयात मार्क्स न पडणे हे होय.
  3. याचा अजूनही एक अर्थ होतो – तुमचा गणित हा विषय चांगला असेल तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहे.
  4. 5000 पैकी 2300 उमेदवारांच्या तुम्ही पुढे असू शकता जर तुम्ही गणितात जास्त गुण मिळवाल

या सर्व निष्कर्षांचा अभ्यास करून तुमच्या आतापर्यंत हे लक्षात यायला हवे की

गणितासारख्या विषयाला दुर्लक्षित करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे शक्य नाही.

अभ्यास करणारे असे खुप मित्र आहे जे मागील दोन ते तीन वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना सातत्याने गणिताचा अभ्यास करत आहे. 

पण तरीही त्यांना या विषयात मार्क्स मिळत नाही? मग नेमके इथे काय चुकत असेल? ते वापरत असणारे पुस्तके चुकीचे आहे की ते ज्या क्लास मध्ये आहे तिथली शिकवण्याची पद्धत चुकीची आहे?

मित्रांनो कधीही पुस्तक, विषय किंवा शिक्षक चुकीचे नसतात, चुकीचा असतो तो दृष्टिकोन.

यामुळे गणितासारख्या रंजक आणि तर्क असणाऱ्या विषयांमध्ये काही मित्रांना कधीच इंटरेस्ट येत नाही त्यांचा कधीच अभ्यास पूर्ण होत नाही कारण –

गणिताचा अभ्यास सुरू करण्यापूर्वीच मित्रांच्या मनात खूप गैरसमज असतात.

एकदा त्यांनी ते समजून घ्यायला हवे 

जोपर्यंत हे गैरसमज डोक्यात ठेवून तुम्ही अभ्यास कराल तोपर्यंत हा विषय तुम्हाला सोपा जाणार नाही.

गणिताबद्दल चे काही गैरसमज :

गणितात जर चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर short cut रस्ता विचारत बसू नका. हे डोक्यात बसलेले गैरसमज तुमचा वेळ वाया घालवतात बाकी काही नाही.

खाली काही गैरसमजाची लिस्ट दिली आहे जे तयारी करणाऱ्या मित्रांच्या डोक्यात इतके पक्के बसले आहे की ते दूर झाल्याशिवाय त्यांना गणित हा विषय सोपा वाटूचं शकत नाही

  1. गणिताचे सर्व सुत्रे पाठ करावे लागतात आणि मला पाठांतर जमत नाही.
  2. xxxx या लेखकाच्या पुस्तकातुनचं परीक्षेला भरपूर प्रश्न येतात.
  3. शॉर्टकट माहित असल्याशिवाय गणिते सुटणार नाही.
  4. गणिताच्या अभ्यासासाठी क्लास करावाच लागतो
  5. मला याआधी गणित जमले नाही म्हणून आताही नाही जमणार नाही
  6. गणितात थोडे मार्क्स घेतले आणि इतर विषयात पैकीच्या पैकी मार्क घेतले तरी आपली पोस्ट निघू शकते.
  7. आठ दिवसात गणिताचा संपूर्ण अभ्यास होऊ शकतो फक्त शॉर्टकट आणि ट्रिक्स समजायला पाहिजे.

इतकेच नाही तर या गैरसमजाच्या प्रभावाखाली तुम्ही अभ्यास सुरू केला तर दोन वर्षे भरपूर अभ्यास करूनही तुम्हाला हा विषय कठीणच वाटेल.

मग या गणित विषयाचा अभ्यास नेमका कसा करायचा? [ How to study Maths ? ] काय करायला हवे की जेणेकरून गणितात चांगले गुण मिळू शकतील.

अभ्यासाची सुरुवात कशी करायची? [ How to Study Maths ]

गणितात चांगले मार्क्स मिळवायचे तर आहे पण मग नेमकी सुरुवात कुठून करू? ज्यांना गणित बिलकुलच येत नाही किंवा ज्यांना बऱ्यापैकी येतं त्या दोन्ही प्रकारच्या मित्रांना हा प्रश्न पडू शकतो.

या दोन्ही प्रकारच्या मित्रांच्या प्रश्नावरती एकच उत्तर आहे – अगदी छोट्या गोष्टी पासून सुरुवात करा.

म्हणजे नेमके काय करायचं ? हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघू.

सुरुवातीचे हे उदाहरण अशा मित्रांसाठी ज्यांना गणित बिलकुलच येत नाही.

ज्यांना गणित बिलकुल येत नाही अशा मित्रांसाठी उदाहरण [ How to study Maths from beginning]

how to solve maths problem

तलाठी 2016 च्या प्रश्नपत्रिकेत आलेला हा एक प्रश्न.

हा प्रश्न तसा सोपा आहे परंतु ज्यांना गणित बिलकूलच येत नाही त्यांना नेमके हे गणित कसे सोडवायचे हे समजणारच नाही. 

कारण या गणितामध्ये दशांश युक्त अपूर्णांक ( उदा. 0.56 ) आहे, याच गणितात अपूर्णांकाची बेरीज आहे ( उदा. 3.0 + 0.4 ) त्याच बरोबर अपूर्णांकांचा भागाकार देखील आहे.

मग आधी काय सोडवायचे ? हा गोंधळ होणार आणि बऱ्याच वेळा तर ज्यांना गणिताची भीती वाटते त्यांना हे उदाहरण बघूनच अवघड वाटेल.

मग मी सांगितलेली टिप्स या प्रकारच्या गणितात कशी वापरता येईल हे बघू.

  1. सगळ्यात आधी दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची हे शिकून घ्या. – यामध्ये साधा नियम आहे दशांशखाली दशांश घ्या. आता हा नियम तुम्ही कुठे शिकणार? अगदी चौथी पाचवीच्या पुस्तकातही तुम्हाला हा नियम शिकायला मिळेल.
  2. दशांश अपूर्णांकाची बेरीज तसेच त्यांचा गुणाकार भागाकार कसा करायचा हे देखील तुम्ही याच छोट्या-छोट्या पुस्तकात शिकू शकता.
  3. किंवा तुम्ही वापरत असणाऱ्या गणिताच्या पुस्तकातही हा नियम तुम्ही शिकू शकता.
  4. एकदा तुम्हाला दशांश ची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या गोष्टी करायला समजल्या तर फक्त या सर्व गोष्टी एकत्रित कशा करायचा? हे तुम्हाला एकदा शिकून घ्यावे लागेल.
  5. अभिनंदन ! तुम्ही मोठी पदावली सोप्या पद्धतीने कशी सोडवायची हे शिकलात.

हे गणित वरील पायऱ्यांचा वापर करून असे सोडवता येईल

आता अशा मित्रांसाठी उदाहरण ज्यांना गणित थोड्याफार प्रमाणात येते. 

ज्यांना गणित थोडेफार सोडवता येतात अशा मित्रांसाठी उदाहरण [ How to study Maths tips for Intermediate Level]

खालील उदाहरण 2016 या वर्षाच्या तलाठी परीक्षेत आलेले आहे.

how to solve mathematics problem and how to study mathematics

बऱ्याच मित्रांना गणिताची आकडेमोड येते परंतु या प्रकारचे शाब्दिक उदाहरणे आले की त्यांचा गोंधळ उडतो.

पण परीक्षा घेणाऱ्याचा सर्वात आवडणारा प्रश्न प्रकार म्हणजे शाब्दिक उदाहरणे.

या प्रकारची शाब्दिक उदाहरणे बघितली की कसे सोडवायचे याबद्दल कन्फ्युजन व्हायला सुरुवात होते. 

आणि मग कदाचित हे उदाहरण आपल्याला जमणार नाही असा विचार करून बरेच मित्र हे उदाहरण न सोडवता पेपर देतात.

 पण परीक्षेत यासारखे अनेक शाब्दिक उदाहरणे असतात आणि हे सर्व शाब्दिक उदाहरणे आपल्याला सोडवता आले नाही याचा अर्थ असाच होतो की गणितात आपल्याला चांगले मार्क्स मिळणार नाही. कारण आपले एकूण सोडवलेली उदाहरणे खूप कमी असतात.

मग अशा वेळी काय करायला हवे?

 पुन्हा मी याआधी सांगितल्याप्रमाणे – छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा या टिप्स चा वापर केला तर आपण शाब्दिक उदाहरणे ही आरामात सोडवू शकतो.

बघूया हे उदाहरण – छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा या टिप्स ने कसे सोडवता येईल?

अवघड गणिते सोडवण्यासाठी कसा विचार करायला हवा ?

  1. सर्वात आधी मी हा विचार करणार की हे उदाहरण गणिताच्या कोणत्या प्रकरणात येते?
  2. थोडासा विचार केला तर उदाहरणातील शेकडा,  टक्के हे शब्द वाचून मला समजते की हे उदाहरण शेकडेवारी याप्रकरणातील आहे.
  3. या नंतर मी असा विचार करायला पाहिजे की मला शेकडा किंवा टक्के काढता येतात का?
  4. जर मला ते येत नसतील तर मी पुन्हा पुस्तकाकडे वळून हे शेकडा किंवा टक्के कसे काढायचे हे शिकून घ्यायला पाहिजे.
  5. शेकडेवारी प्रकरणाचा अभ्यास केला की माझ्या लक्षात येईल की या प्रकरणांमध्ये सर्व गोष्टी 100 या एकाच आकड्या भोवती फिरत असतात.
  6. एकदा ते शिकलो किंवा मला ते याआधीच येत असेल तर मी यापुढे असा विचार करेल की या गणितात मला कशाचे किती टक्के काढायचे आहे.
  7. जर शेकडेवारी चा संबंध 100 शी येतो तर या प्रकरणात मला 100 कुठे वापरायचे आहे? तर उदाहरण वाचल्यानंतर माझ्या लक्षात येईल की मला लोकसंख्येसाठी 100 वापरायचे आहेत.
  8. हा सर्व विचार केल्यानंतर मी हे उदाहरण असे सोडवेल – 

solotion-how-to-study-maths-studywadi

अभिनंदन तुम्ही शाब्दिक उदाहरणे कसे सोडवायचे हेदेखील शिकला आहात.

मित्रांनो छोट्या गोष्टी पासून सुरुवात करून मोठ्या गोष्टी पर्यंत जाणे हाच गणित शिकण्याचा एकमेव आणि सोपा उपाय आहे.

या नंतर गणितात आणखी प्रगती करण्यासाठी काय शिकायला पाहिजे ?

आजच्या आर्टिकल मध्ये गणिताची नेमकी सुरुवात कशी करायची [ How to study Maths ? ] हे आपण बघितले

परंतु काही गणिते असतात ज्यांच्यासाठी आपल्याला अभ्यासाच्या वेगवेगळ्या टेक्निक्स वापराव्या लागतात.

या सर्व टेक्निक्स आणि या आर्टिकल च्या सुरुवातीच्या भागात सांगितलेले गैरसमज दूर करण्यासाठी यानंतरच्या लेखामध्ये आपण गणिताच्या अभ्यासासाठी 7 महत्त्वाच्या टिप्स बघू.

गणिताचा अभ्यास करताना छोट्या गोष्टी पासून सुरुवात करण्यासाठी मी तर शालेय पाठ्यपुस्तके वापरण्याचा सल्ला देतो

पण त्याच बरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी बाजारात गणित विषयाचे अनेक चांगले पुस्तके उपलब्ध आहेत. 

तुमच्याकडे गणिताचे कोणते पुस्तक आहे?

मला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक वाचा

पोलीस भरती परीक्षेच्या तयारीसाठी वेळापत्रक कसे तयार करायचे ? अभ्यासाचे नियोजन कसे करायचे याबद्दल तुम्ही मी लिहिलेले एक आर्टिकल वाचू शकता. हे आर्टिकल वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : How To Prepare Study Plan ? [ अभ्यासाचे वेळापत्रक कसे तयार करायचे ? ]

22 thoughts on “How to Study Maths? [ स्पर्धा परीक्षेसाठी गणिताचा अभ्यास कसा करायचा ? ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!