Free :

How To Prepare Study Plan ? [ अभ्यासाचे वेळापत्रक कसे तयार करायचे ? ]

परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर बऱ्याच मित्रांचा एक प्रश्न असतो की अभ्यास कसा करायचा? अभ्यासाचे वेळापत्रक कसे तयार करायचे ? [ How To Prepare Study Plan ]

तारीख जाहीर झाल्यानंतर हातात खूप कमी दिवस शिल्लक असतात. अभ्यासात काय करू आणि काय नको करू हा मोठा प्रश्न असतो.

एखाद्या विषयाला खूप वेळ दिला जातो तर एखादा विषय दुर्लक्षित राहून जातो. आवडीच्या विषयात खूप वेळ जातो तर अवघड विषयाला आवड नसल्यामुळे वेळ देणे शक्य होत नाही. मग अशावेळी असा प्रश्न निर्माण होतो की अभ्यासाचे नियोजन कसे करायचे?

मित्रांनो हीच समस्या आजच्या या आर्टिकल मध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासाचे नियोजन कसे करायचे?  कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा ? एखाद्या विषयाचा अभ्यास रोज करायचा का ? कोणत्या विषयांना आठवड्यातून काही दिवस द्यायचे? 

या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या आर्टिकल मध्ये बघण्याचा प्रयत्न करू.

अभ्यासाचे नियोजन कसे करायचे? How To Prepare Study Plan?

नियोजनाशिवाय अभ्यास करणे म्हणजे पत्ता माहीत नसताना प्रवास करणे. मग यामध्ये आपण चालत जातो परंतु जिथे पोहोचायचं तिथे पोहोचत नाही. फक्त अभ्यास करत राहिल्याने तुम्हाला पोस्ट मिळेल हे खरे नाही.

नियोजनाशिवाय अभ्यास करणे म्हणजे पत्ता माहीत नसताना प्रवास करणे. मग यामध्ये आपण चालत जातो परंतु जिथे पोहोचायचं तिथे पोहोचत नाही.

फक्त अभ्यास करत राहिल्याने तुम्हाला पोस्ट मिळेल हे खरे नाही.

एका जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या बघितली असता नशिबाने यश मिळते हे म्हणणे चूक आहे.

यश मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त प्रयत्न करून चालणार नाही तर त्यासाठी एका विशिष्ट दिशेने प्रयत्न करावा लागेल.

अभ्यासाचे नियोजन करताना खालील गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

  1. काही विषयांचा अभ्यास रोज करायचा असतो तर काही विषयांना आठवड्यातून काही दिवस नेमून द्यायचे असतात.
  2. एखादा विषय सोपा आवडीचा वाटतो म्हणून भरपूर वेळ त्यालाच देणे चूक आहे कारण परीक्षेत सर्व विषयांवरती प्रश्न विचारले जाणार असतात
  3. परीक्षेची तारीख जाहीर होईपर्यंत आणि तारीख जाहीर झाल्यानंतर असे अभ्यासाची दोन वेगवेगळे नियोजन असू शकतात.
  4. सोपे विषय अवघड विषय अशी विभागणी करून अभ्यास करायला हवा म्हणजे त्यानुसार त्या विषयांना वेळ देता येईल.
  5. अभ्यासाच्या नियोजनात रिविजन, प्रश्नपत्रिकांचा सराव या गोष्टींनाही वेळ द्यायला पाहिजे. बरेच मित्र फक्त अभ्यास करतात परंतु आपल्या नियोजनात प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी वेळ ठेवत नाही. यामुळे परीक्षेत कमी मार्क्स मिळतात.
  6. रिविजनही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे कारण सगळा अभ्यास एकाच वेळी लक्षात राहीलच असे नाही.

मग आता प्रत्यक्षात नियोजन कसे करायचे हे बघू.

अभ्यासाचे नियोजन एक नमुना : [ Example of Study Plan ]

समजा माझ्याकडे अभ्यासासाठी चार विषय आहेत.

  1. मराठी
  2. गणित
  3. बुद्धिमत्ता
  4. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी

सगळ्यात सुरुवातीला मी हे ठरवायला पाहिजे की यामध्ये कोणते विषय असे आहेत ज्यांचा अभ्यास मला रोज करावा लागेल.

जे विषय मला सोपे जातात आणि ज्यामध्ये मला चांगले गुण मिळतात त्यांना मी कमी वेळ दिला तरी हरकत नाही.आणि अशा विषयांचा अभ्यास रोज न करता ठराविक अंतराने केला तरी हरकत नाही.

मग रोज कोणत्या विषयांचा अभ्यास करणार?

समजा मला गणित हा विषय अवघड वाटतो. म्हणून मी माझ्या वेळापत्रकात गणित या विषयासाठी रोज काही वेळ राखून ठेवायला पाहिजे.

त्याच प्रमाणे सामान्य ज्ञान या विषया सोबत असणाऱ्या चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास रोजच्या रोज केला तरच फायदा होईल.

महिन्याभराच्या घडामोडी एका दिवसात किंवा एका आठवड्यात लक्षात राहणे शक्य नाही किंवा सोपेही नाही.

म्हणून माझ्या अभ्यासाच्या नियोजनाचा चार्ट खालीलप्रमाणे असेल.

How To Prepare Study Plan ?

या चार्ट चे खालील प्रमाणे दोन भाग केले आहे –

  • रोज अभ्यास करण्याचे विषय
  • दिवसानुसार अभ्यास करण्याचे विषय

रोज अभ्यास करण्याचे विषय :

माझ्या नियोजनात अवघड वाटणारा गणित हा विषय आणि सामान्य ज्ञान हे दोन विषय रोजच्या अभ्यासाच्या नियोजनात असणार आहेत. कारण अवघड विषयाला यामुळे जास्त वेळ मिळेल आणि चालू घडामोडी सारखा विषय रोजच्या रोज केल्याने मला सोपे पडेल.

दिवसानुसार अभ्यास करण्याचे विषय : 

दिवसानुसार अभ्यास करण्यासाठी मात्र माझ्याकडे दोन विषय शिल्लक आहे मराठी आणि बुद्धिमत्ता.

आठवड्यात माझ्याकडे असणारा दिवसांपैकी अर्धे दिवस मराठीसाठी आणि अर्धे दिवस बुद्धिमत्ता या विषयासाठी देऊ शकतो.

अशाप्रकारे अभ्यासाचे केलेले नियोजन हे समतोल असेल कारण यामध्ये अवघड विषयाला रोज वेळ दिल्याने जास्त तर ज्या विषयांचा अभ्यास रोज करायला हवा त्यांना रोज मिळेल.

दिवसभराचे अभ्यासाचे नियोजन कसे असावे?

वरती दिलेल्या नियोजनानंतर येणारा भाग म्हणजे संपूर्ण दिवसभराचे नियोजन करणे होय. 

दिवसभराच्या अभ्यासाचे नियोजन प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते. काही मित्रांना अभ्यासासाठी सकाळी वेळ मिळतो काहींना दुपारी मिळतो तर काहींना रात्री वेळ मिळतो.

अभ्यासाची प्रत्येकाची सवयही वेगवेगळी असते. 

त्यामुळे खाली दिलेले नियोजन हे सर्वांसाठीच लागू होईल असे नाही परंतु आपल्या वेळेनुसार या नियोजनामध्ये बदल करून हे सर्वांना वापरता येईल.

हे नियोजन करताना खालील पायऱ्यांचा वापर करा – 

नियोजनाशिवाय अभ्यास करायला बसलात तर फक्त तुमचा वेळ वाया जाईल. 1 ते 2 तास बसल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कि वेळ तर भरपूर झाला पण त्या प्रमाणात अभ्यास खूप कमी झाला आहे. त्यासाठी काय अभ्यास करायचा आणि कधी करायचा हे माहित असणे गरजेचे आहे आणि हे सर्व माहित फक्त एक साध्या नियोजनामुळे होऊ शकते.

प्रत्येकाचे नियोजन वेगवेगळे असणार आहे कारण प्रत्येकाला उपलब्ध होणारा अभ्यासाचा वेळ वेगवेगळा असणार आहे पण तरीही खाली काही महत्वाचे मुद्धे दिले आहेत.

हे मुद्दे फक्त अभ्यास करणाऱ्या, काम करून अभ्यास करणाऱ्या सर्व मित्रांना नियोजन कसे करायचे हे सांगायला मदत करतील

स्वतः केलेले नियोजन खूप चांगले असते कारण त्यात आपल्या उपलब्ध वेळा आणि अडचणीच्या वेळा असतात म्हणून खालील मुद्द्याचा आधार घेऊन तुमचे नियोजन बनवा

नियोजन करण्यासाठी काही मुद्दे

  1. दिवसभराचे नियोजन करण्याआधी तुमच्याकडे दिवसभरात उपलब्ध असणाऱ्या वेळा एकदा लिहून घ्या
  2. ज्या वेळेत अभ्यास करायला तुम्हाला फ्रेश वाटते ते तास आणि थोडासा कंटाळा येतो ते तास असे दोन वेगवेगळे भाग करा.
  3. फ्रेश वेळ ही नवीन काहीतरी शिकण्यासाठी, अवघड विषयासाठी राखून ठेवा.
  4. ज्या वेळेत कंटाळा येतो त्या वेळेत तुमच्या आवडीचा विषय अभ्यासाला घ्या.
  5. तुमचे अभ्यासाचे वेळापत्रक खूप  किचकट बनवू नका कारण किचकट वेळापत्रक प्रत्यक्षात अमलात आणणे अवघड असते.
  6. वेळापत्रकात सुरुवातीलाच अभ्यासाचे खूप तास नेमून देऊ नका कारण असे केल्याने अचानक अभ्यासाचे ओझे तुम्हाला जाणवू शकेल.
  7. वेळापत्रकामध्ये अभ्यासाच्या वेळा बरोबरच स्वतःसाठी सुट्टीचे काही तास वेगळे करून ठेवा.सलग काही तास अभ्यास करण्यापेक्षा मध्येमध्ये छोटा छोटा ब्रेक घेऊन केलेला अभ्यास जास्त लक्षात राहतो.
  8. वेळापत्रक असेच बनवा जे पाळणे सोपे जाईल. सुरुवातीच्या दिवसांमध्ये कमी अभ्यास झाला तरी हरकत नाही. हळूहळू ही क्षमता वाढत जाईल.
  9. बऱ्याचदा आपण ठरवलेल्या वेळेनुसार अभ्यास होणार नाही कारण अभ्यास करताना मध्ये बऱ्याच गोष्टी येऊ शकतात परंतु तरीही असा डिस्टर्बन्स आल्यानंतरही उरलेले वेळापत्रक पाळण्याचा प्रयत्न करा.
  10. आपल्याला नेहमी दिसेल अशा ठिकाणी आपले वेळापत्रक ठेवा म्हणजे कोणत्या वेळी काय करायचे हे लगेच बघता येईल आणि त्यानुसार नियोजन करता येईल.

वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून खाली एक वेळापत्रकाचा नमुना दिला आहे तुमचे वेळापत्रक यापेक्षा वेगळे असू शकते. या नमुन्यामध्ये तुम्हाला हवा तसा बदल करून घ्या. आणि अभ्यासाला सुरुवात करा.

दिवसभराच्या अभ्यासाच्या नियोजनाचा एका नमुना :

how to prepare study plan

परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

अभ्यासाचे नियोजन पाळताना तुम्हाला काय काय अडचणी येतात हे कमेंट मध्ये नक्की कळवा.

47 thoughts on “How To Prepare Study Plan ? [ अभ्यासाचे वेळापत्रक कसे तयार करायचे ? ]”

  1. Vishal.s.patil😊☺😎

    ☺Thanks sir.🙂खुप HELP झाली.चांगले मार्गदर्शन केलेसा.🙏🙏🙏👍👌

  2. Sir mi Divyang students ahe mala English Ani math khup adchani jad bhari jato plz ashya kahi pdf notes tayar Kara plz basics solution zal pahije plz mo.8830794728 plz call Kara sir please help me sarv post vaya jat ahe plz

  3. सुभाष हेमराज राऊत

    माय नेम सुभाष हेमराज राऊत मु:डोंगरगांव पो: चिचगड़ ता: देवरी
    जीला: गोंदीय
    पिन कोड: ४४१९०१
    मोबाइल नं:९६९९७२२८२६
    डेट ऑफ बर्थ :२०/०३/२००६
    आधार नं:७९९३–३२७५–०४२९

  4. Thanks sir.. सर्व काही अभ्यासा बद्दल च्या शंका दूर झाल्या खूप खूप
    धन्यवाद sir… 🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!