Talathi Bharti 2021 – General Information सामान्य माहिती
पदांची संख्या
तलाठी संख्या: 12636
कार्यरत तलाठी: 10340
रिक्त पदे: 2296 (येथे संख्या कमी-जास्त होऊ शकते).
2019-2020 मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.यापूर्वी 26 जिल्ह्यातील तलाठी भरती [ Talathi Bharti ] प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.
Age Limit for Talathi Recruitment – वयोमर्यादा
तलाठी पदाची जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 33 वर्षापेक्षा जास्त नसावे.
मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 38 वर्ष अशी राहील. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 43 वर्ष आहे. प्रक्षेपित/भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 18 ते 45 वर्ष आहे.
Talathi Bharti qualification – शैक्षणिक पात्रता
तलाठी पदासाठी संवैधानिक विद्यापीठाची पदवी उमेदवाराने धारण करणे आवश्यक असते. तसेच शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.
संगणक विषयी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत ती अहर्ता प्राप्त करणे आवश्यक राहील.
अर्ज करण्यासाठी शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी – 500 रुपये
मागास वर्गीयासाठी – 350 रुपये
How to apply for Talathi Recruitment – अर्ज करण्याची पद्धत
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जदाराचे स्वतःचे email accountआवश्यक आहे.
अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit बटणावर क्लिक करावे.अर्जाची प्रत आपल्या email वर प्राप्त होते.
Talathi Bharti Selection Process निवडीची प्रक्रिया
Talathi Bharti Selection Process – उमेदवाराची निवड कशी होते
जिल्हानिवड समितीमार्फत तलाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाते.प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती कार्य करते.
निवड समितीतर्फे तलाठी या ‘गट – क’ संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात. परीक्षेसाठी पात्र असलेले उमेदवार अर्ज करतात.
त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते. त्यातून प्रत्येक जास्तीत जास्त मार्क असणाऱ्या उमेदवारांची मेरीट लिस्ट लागते. प्रत्येक जिल्ह्यानुसार मेरीट लिस्ट हे वेगवेगळी लागते.
Talathi Merit List – मेरिट लिस्ट कशी लावली जाते?
तलाठी पदासाठी गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी एकूण गुणांच्या 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ठरलेल्या जागेनुसार मेरिट लिस्ट लागते.
लेखी परीक्षा –
Talathi Bharti Syllabus – परीक्षेचा अभ्यासक्रम
तलाठी पदासाठीची लेखी परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. 100 प्रश्नांना प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे एकूण 200 गुण असतील. परीक्षेसाठीचा कालावधी दोन तासाचा असेल.
Talathi Bharti Marathi Syllabus
तलाठी परीक्षेमध्ये मराठी या विषयाचे एकूण 25 प्रश्न असतात आणि त्यासाठी 50 गुण असतात.
मराठी विषयाच्या पेपरचा दर्जा हा बारावीपर्यंतचा असतो.
व्याकरणातील समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, क्रियापद,विशेषण,विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द इत्यादी घटकांवर प्रश्न विचारले जातात.
मराठी या विषयाची तयारी करण्यासाठी मो. रा. वाळंबे सरांचे पुस्तक तसेच बाळासाहेब शिंदे सर यांचे पुस्तक उपयोगी आहे. त्याचबरोबर ऑनलाइन देखील अनेक प्रश्न उपलब्ध आहेत.
Talathi Bharti English Syllabus
‘इंग्रजी’ या विषयासाठी देखील 25 प्रश्न संख्या व 50 गुण असतात.
इंग्रजी विषयाच्या प्रश्नांचा दर्जा हा पदवीपर्यंतचा असतो.
Vocabulary, synonyms and antonyms, proverbs, tense and kinds of tense, question tag, use proper form of verb, spot the error,verbal comprehension passage, spellings,sentence structure, one word substitution phrases etc..इंग्रजी विषयांमध्ये या घटकांवर प्रश्न विचारले जातात.
Talathi Bharti General Knowledge Syllabus
‘सामान्य ज्ञान’ या विषयांमध्ये महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायत राज व राज्यघटना, भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र, चालू घडामोडी ( चालू घडामोडीचा अभ्यास असा करा ) महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य भारताच्या शेजारील इतर देश आणि विषयी माहिती इत्यादी अनेक घटकावर प्रश्न विचारले जातात.
या विषयाचे देखील 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतात आणि या प्रश्नांचा दर्जा पदवी पर्यंतचा असतो.
यासाठी एकनाथ पाटील सरांचा ठोकळा अतिशय उपयोगी आहे.
Talathi Bharti Ganit Syllabus
अंकगणित आणि बुद्धिमत्ता मिळून 25 प्रश्न 50 गुणासाठी असतात. ‘अंकगणित’ यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ काम व वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन मापनाची परिमाणे, घड्याळ यांवर प्रश्न विचारले जातात.
पोलीस भरती या ग्रुपवर घेतले जाणारे सागर सरांचे तयार केलेले गणिताचे प्रश्न रोजच्या रोज सोडवले तर खूप जास्त अभ्यास करण्याची गरजच उरत नाही.त्यांनी प्रश्न खूप अप्रतिम रित्या उत्कृष्टरित्या सोडून दाखविले आहेत.
Talathi Bharti Buddhimatta Syllabus
तर बुद्धिमत्ता यामध्ये अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे समसंबंध, अंक अक्षर आकृत्या, वाक्यावरुन निष्कर्ष, वेनँआकृती इत्यादी घटकांवर प्रश्न विचारले जातात.
गुण देण्याची पद्धत
या परीक्षेमध्ये नकारात्मक गुणपद्धती लागू नाही. प्रत्येक एका प्रश्नासाठी दोन गुण मिळतात. असे एकूण 100 प्रश्नाला 200 गुण असतात.
प्रश्नाची काठिण्य पातळी कशी असते?
तलाठी परीक्षेमधील प्रश्नांची काठिण्य पातळी ही समसमान असते.
सामान्य विद्यार्थी ते हुशार विद्यार्थी असा विचार करून प्रश्न तयार केले जातात.
काही प्रश्न हे खूप सोपे असतात तर काही प्रश्नांसाठी चांगला अभ्यास करावा लागतो व त्यातूनच मेरीट लिस्ट तयार होते.
Talathi Bharti 2021 ची तयारी कशी करावी?
- या परीक्षेची तयारी करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाठीमागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे आणि मागील प्रश्नांचे विश्लेषण करणे.
- तलाठी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता यांसारखे प्रश्न अवघड वाटतात.
- परंतु त्याचा जास्तीत जास्त सराव केल्यास पैकीच्या पैकी मार्क मिळवता येतात.
- या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान या घटकाची व्याप्ती भरपूर आहे.
- यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, चालू घडामोडी, महाराष्ट्रातील समाज सुधारक, महाराष्ट्र विषयक सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे अशा अनेक विषयांचा समावेश होतो.
- तलाठी भरती परीक्षेची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे यासाठी इयत्ता पाचवी ते बारावी पासून चे क्रमिक पुस्तके वाचली पाहिजेत. त्याचा चांगला अभ्यास केला पाहिजे. तरच यात यश मिळवता येईल.
Talathi Bharti Online Practice Test / Exam
खालील बटनावर क्लिक करून तुम्ही फ्री सराव संच सोडवू शकतात
Talathi Bharti 2021 महत्वाच्या तारखा
अर्ज स्विकारण्याची सुरुवात – Application Opened on
सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व भरती प्रक्रिया स्थगित आहे. पण आपण सर्वांनी अपेक्षा करूया की तलाठी भरती [ Talathi Bharti ] ही लवकर निघेल आणि आपण सर्वजण उत्साहाने जोमाने त्याची तयारी करून तलाठी परीक्षा नक्की पास होऊ.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख – Last date for Online Application
will be updated soon
Talathi Bharti Admit Card – प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची तारीख –
will be updated soon
परीक्षेची तारीख – Talathi Exam Date
will be updated soon
निकालाची तारीख – Talathi Exam Result
will be updated soon
Read More :