म्हणी आणि अर्थ 02Marathi Grammar - मराठी व्याकरण म्हणी आणि अर्थ 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. अठरा नखी …….. राखी वीस नखी घर राखी. दार खेटरे घर पार 2. चोरावर मोर म्हणजे – एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे. अतिशय दुराग्रहाचे किंवा हट्टाचे वागणे. यापैकी नाही. मोराने चोरावर चढणे. 3. खाली दिलेले वाक्य पूर्ण करा. अतिश्रीमंतीमुळे आमच्या शेजारील गृहस्थांना ….. ची बाधा झाली. ग प क ब 4. वरातीमागून घोडे’ या म्हणीचा अर्थ काय होतो ? विश्वासघात करणे. आधी वरात पाठवणे आणि मग घोडे पाठवणे. एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे. वेळ निघून गेल्यावर काम करणे. 5. गरजेल तो पडेल काय ? – या म्हणीचा काय अर्थ होतो ? नको तिथे नको ती गोष्ट करणे. पाऊस गरजला की तो पडतो. केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही. वाईटात आणखी वाईट घडणे. 6. एका खांद्यावर द्वारका – या म्हणीचा अर्थ काय होतो ? खूप निर्बुद्ध लोकांमध्ये एखादा शहाणा. एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. प्रत्येक मनुष्य त्याच्या क्षमतेनुसार काम करतो. यापैकी नाही. 7. अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे – या म्हणीचा अर्थ काय आहे ? दागिण्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि नंतर जन्मभर फेडत बसायचे गरजेपेक्षा जास्त जेवण केल्याने त्रास होतो. फक्त स्वतःचा फायदा करून घेणे. कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच. 8. ओठात एक आणि पोटात एक – या म्हणीचा अर्थ काय होतो ? मनातील हेतू आणि बोलून दाखवलेला विचार यात तफावत असणे. क्षणात खरे आणि क्षणात खोटे बोलणे. शहाणपणाचे सोंग आणणे. एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळे विचार करणे. 9. एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही सक्षम असतो – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. गाढवाच्या पाठीवर गोणी. खाऊ जाणे तो पचवू जाणे. कुडी तशी फोडी. खऱ्याला मरण नाही. 10. पुढील म्हणीचा अर्थ सांगा. कामापुरता मामा आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. अतिशय उतावळेपणाची स्थिती. मामाकडून भरपूर काम करून घेणे. एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या टाकणे. 11. म्हण पूर्ण करा. ……. गेला लुटी आणल्या दोन मुठी. बेडूक साप ससा उंदीर 12. घेता …….. देता शिमगा – म्हण पूर्ण करा. होळी संक्रांत पोळी दिवाळी 13. चुकीचा पर्याय निवडा. चोराच्या उलट्या बोंबा – स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे. तुकारामबुवाची मेख – सोपी गोष्ट बाप तैसा बेटा – बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे. सर्व पर्याय योग्य आहेत. 14. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय ? कोल्ह्याला काकडी आवडते. गैरसमजूतीत राहणे. लहान लोक लहान गोष्टींनी खुश होतात. अतिशय उताविळपणा दाखवणे. 15. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? ये रे कुत्र्या खा माझा पाय. परिस्थिती पाहून वर्तन करणे. एखादी गोष्ट फुगवून सांगणे. आपण होऊन संकट ओढवून घेणे. एकाला दुसरा वरचढ भेटणे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14/15