मराठी व्याकरणात वाक्याच्या प्रकारांची तीन प्रकारे विभागणी करता येते –
All Important Points
- अर्थावरून पडणारे प्रकार वाक्याचे प्रकार
- विधानाच्या संख्येवरून पडणारे वाक्याचे प्रकार
- क्रियापदाच्या रुपावरुन पडणारे वाक्याचे प्रकार
अर्थावरून पडणारे प्रकार :
वाक्य नेमके कोणता अर्थ व्यक्त करते यावरून वाक्याचे खालील प्रकार पडतात
- विधानार्थी वाक्य
- प्रश्नार्थक वाक्य
- उद्गारार्थी वाक्य
- होकारार्थी वाक्य
- नकारार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य –
हे वाक्य माहिती सांगणारे वाक्य असते. या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवटी एक पूर्णविराम असतो
उदा –
- विशाल शाळेत गेला
- सरिता गाणे म्हणत आहे
प्रश्नार्थक वाक्य –
ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते.
उदा –
- रमेश कुठे गेला आहे?
- आज कोणता वार आहे?
उद्गारार्थी वाक्य –
या वाक्यातून भावना व्यतित होत असतात. या वाक्यात उद्गारवाचक चिन्ह वापरलेले असते.
उदा –
- अरे वा ! काय छान गाणे गायले आहे तू !
- अरेरे! असे शब्द तू बोलायला नको होते.
होकारार्थी वाक्य –
यांना करणरुपी वाक्य असे सुद्धा म्हणतात कारण यातून होकार दर्शवला जातो.
उदा.
- मी तुम्हाला माहिती देणार आहे
- सशाला गाजर आवडतात
नकारार्थी वाक्य –
यांना अकरणरुपी वाक्य असे देखील म्हणतात कारण हे वाक्य नकार दाखवणारे असतात.
उदा.
- मला तुमची मदत नको आहे.
- कधी कोणाला फसवू नये.
विधानाच्या संख्येवरून पडणारे वाक्याचे प्रकार :
वाक्यात असणारे विधाने किती आणि कोणत्या प्रकारचे आहे याचा विचार करून वाक्याचे खालील प्रकार सुद्धा पडतात
- केवल वाक्य
- संयुक्त वाक्य
- मिश्र वाक्य
केवल वाक्य –
ज्या वाक्यात एक उद्देश आणि एकच विधेय असते त्या वाक्याला केवल वाक्य म्हणतात. या वाक्यात एकच मुख्य क्रिया घडलेली असते.
उदा.
- आज सर्वांनी बाहेर पडायला हवे.
- दार उघडुन अनिकेत रस्त्यावर आला.
संयुक्त वाक्य –
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने दोन किंवा अधिक केवल वाक्य जोडून संयुक्त वाक्य तयार होते. या वाक्यात एकापेक्षा जास्त क्रिया असतात.
उदा.
- पैसे मिळाले आणि बँक बंद झाली
- या वर्षी पाऊस चांगला पडला पण म्हणावे तसे उगवले नाही.
मिश्र वाक्य –
या मध्ये एकापेक्षा अधिक वाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात मात्र या प्रकारच्या वाक्यात मुख्य वाक्य एक आणि गौण वाक्य अनेक असतात.
उदा.
- जेव्हा पैसे मिळाले तेव्हाच भीमा उठला
- आजोबा लवकर झोपले कारण आज ते खूप दमले होते.
क्रियापदाच्या रुपावरुन पडणारे वाक्याचे प्रकार :
वाक्यात वापरलेले क्रियापद कसे आहे यावरून सुद्धा वाक्याचे प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे आहे.
- स्वार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य
- विध्यर्थी वाक्य
- संकेतार्थी वाक्य
स्वार्थी वाक्य –
ज्या वाक्यातील क्रियापद फक्त माहिती सांगते आणि काळ दर्शवते ते वाक्य स्वार्थी वाक्य असते.
उदा.
- कृष्णा बसला आहे.
- रीमा अभ्यास करत होती.
आज्ञार्थी वाक्य –
ज्या वाक्यातील क्रियापद हे आज्ञा दाखवते ते आज्ञार्थी वाक्य असते. लक्षात घ्या – मोठ्यांना सांगितलेले काम सुद्धा व्याकरणात आज्ञा समजली जाते.
उदा.
- विष्णू गुपचूप जागेवर बस.
- पप्पा, मला पुस्तक घेऊन द्या.
विध्यर्थी वाक्य –
या वाक्यातील क्रियापदामुळे कर्तव्य शक्यता इच्छा किंवा योग्यता यांचा बोध होत असतो. असे क्रियापद नेहमी ‘ वा वी वे ‘ अशा शब्दानी संपते.
उदा.
- मला आज तरी चांगले मार्क्स मिळावे
- गरिबांना मदत करावी
संकेतार्थी वाक्य –
या वाक्यांना जर तर चे वाक्य असे म्हणतात.
उदा.
- जर वीज गेली तर आजचा कार्यक्रम होणार नाही
- जेव्हा पैसे मिळतील तेव्हा काम सुरू होईल.
मित्रांनो वरील अभ्यास तुमचा पूर्ण झाला असेल तर या प्रकरणावर आधारित खालील प्रश्न सोडवून तुमचा अभ्यास तपासा… बघा तुमची किती तयारी झाली आहे तर?
वाक्य आणि वाक्याचे प्रकार या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न एकत्रित करून तयार केलेली ही मराठी व्याकरण टेस्ट सोडवा आणि येणाऱ्या परीक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा.
वाक्य आणि वाक्याचे प्रकार – Marathi Grammar TEST
आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मला कमेंट करून नक्की कळवा
15/15