Free :

Study Tips By Sagar Sir

3 चुका सांगतो – ज्या रीविजन करताना बरेच जण करतात

3 चुका सांगतो – ज्या रीविजन करताना बरेच जण करतात. तुम्ही पण तसेच करत असाल तर तुम्ही पालथ्या घडावर पाणी घालत आहात.

मराठी व्याकरणाचे उदाहरण घेऊन हे समजावून सांगतो –

  1. रिविजन कशाची करायची हेच क्लियर नसणे –

रिविजन करायची म्हणजे पुस्तकात दिलेले सगळेच वाचून काढायचं असं नसतं.

पुस्तकातलं सगळ्याच्या सगळं वाचून काढणं याला पारायण करणे म्हणतात.  आपल्याला रिविजन करायची आहे.

महत्त्वाचं, अंडरलाईन केलेलं, विसरलेलं, हे माहिती आहे पण आता आठवत नाही  – हे सर्व पुन्हा वाचणे म्हणजे रिविजन.

  1. शिकण्यासाठी जितका वेळ लागतो तितकाच वेळ रिविजन करण्यासाठी घेणे

शिकताना विभक्तीचे 6 पाने वाचण्यासाठी तुम्ही 1 तास वेळ घेतला असेल

आणि पुन्हा पंधरा दिवसांनी विभक्ती वाचायला घेतली आणि पुन्हा त्याला एक तास लागला तर ती रिवीजन कसली?

शिकायला एक तास लागला असेल तर पहिल्या रिविजनला 30 मिनिटे, दुसऱ्या रिजनला पंधरा मिनिटे , तिसऱ्या रिविजनला 5 पाच मिनिटे असा वेळ लागायला पाहिजे.

  1. जे ऑलरेडी येते त्यालाच रिविजन करणे –

मला समासाचे चार प्रकार माहिती आहे.

पहिले पद महत्त्वाचे , दुसरे पद महत्त्वाचे,  दोन्ही महत्त्वाचे की एकही महत्त्वाचे नाही – यानुसार हे प्रकार पडतात हे माझ्या लक्षात आहे.

मग पुन्हा रिविजन करताना हे चार प्रकार , त्यातले कोणते पद महत्त्वाचे हे लक्षात असलेले पुन्हा वाचून काय फायदा?

त्यापेक्षा समासाचे उदाहरणे, त्यांचे अपवाद, आपल्याला चकवा दिलेला प्रश्न – हे वाचायला पाहिजे.

प्रॉपर रिविजन कशी करायची असते याचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा. आणि तुमच्या सोबत तुमच्या ज्या मित्राचे पोस्ट स्वप्न पूर्ण व्हावे असे तुम्हाला वाटते त्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा.

पेपर हातात पडल्यावर पहिल्या पाच मिनिटात काय करायचं?

पेपर हातात पडल्यावर पहिल्या पाच मिनिटात काय करायचं हे सांगतो.

  1. पहिल्या चार मिनिटात पेपरची आउटलाइन बघून घ्या.

90 मिनिटे कमी पडतात म्हणून आपण काय करतो?

पेपर हातात पडला की लगेच पहिल्या प्रश्नापासून सुरू.

असे करू नका.

क्रिकेट बघता ना? चेस करायला 300 350 की 400 रणांचे टारगेट आहे हे डोक्यात ठेवून टीम अग्रेसिव्ह की डिफेन्सिव्ह खेळायचं ही स्ट्रॅटेजी ठरवते.

तुमचा पेपर हे सुद्धा एक टारगेट आहे.

हातात पडला की चार मिनिटे – पहिल्या प्रश्नापासून ते शेवटच्या प्रश्नापर्यंत नजर मारा.

तेव्हा तुमच्या लक्षात येईल गणितात कुठे कुठे अरे वा आणि बापरे म्हणायला लावणारे प्रश्न आले आहेत.?

बुद्धिमत्ता किती वेळ खाऊ आहे?

मराठीतले काय आहे जे आपल्याला येत नाही?

जीके करंट अफेयर्स वाचलेलं आहे की दुसरेच आले आहे?

या चार मिनिटात क्लियर होते – आपला पेपर कसा आहे?

तुम्हाला वाटेल – हे चार मिनिटं वाया जात आहे.

पण घरी येऊन – मला हे येत होतं पण याला वेळच भेटला नाही – हे चार महिने म्हणायचे नसेल तर हे चार मिनिटे द्या.

  1. आता उरलेल्या एका मिनिटात स्ट्रॅटजी ठरवा.

पेपर तीन प्रकारचा असू शकतो – सोपा मिडीयम किंवा अवघड.

पेपर सोडवणाऱ्या मित्रांची सायकॉलॉजी मला माहित आहे –

पेपर सोपा असेल तर मनात लड्डू फुटतो.

अवघड असेल तर बॉम्ब!

.पण –

सोपा आला म्हणून हॉलमध्येच वर्दी घालायची नसते. – सोपा पेपर सर्वांनाच सोपा असतो – मेरिट हाय लागत असते.

पेपर अवघड आला म्हणून – आता कसे ? म्हणत सैरावैरा पळायचे नसते.

अवघड पेपर सर्वांनाच हार्ड जातो. – मेरिट low लागणार असते.

म्हणून पेपर सोडवण्यापूर्वी : तुमच्या विशेषनामाला सांगा –

बुद्धी स्थिर ठेवून पेपर सोडव. एका मिनिटात होईल.

आणि उरलेल्या 85 मिनिटात मॅच जिंकून तुम्ही man of the match ठराल.

फक्त एकाच पेपरला हे वापरून होणार नाही.

यासाठी तुम्हाला भरपूर पेपर सोडवावे लागतील.

High क्वालिटी असे अनेक पेपर आपल्या स्टडी वाडी ॲप मध्ये उपलब्ध आहे.

आणि यावर्षी ज्याचे पोस्टचे स्वप्न पूर्ण व्हावे असे तुम्हाला वाटत असेल त्या मित्राला शेअर करा.

Don`t copy text!