Free :

संधी आणि संधीचे प्रकार

संधी आणि संधीचे प्रकार in Marathi Grammar is one of the important chapter for All Competitive Exams Like MPSC , Police Bharti , Talathi Bharti

Solve All the Important Questions of Marathi Grammar based on Topic :संधी आणि संधीचे प्रकार This is Marathi Grammar Test useful for MPSC , Police Bharti , Talathi Bharti , Van rakshak Bharti , Arogya Sevak Bharti , Post Bharti and Krushi Sevak Bharti

Question Set Based On संधी आणि संधीचे प्रकार

एकदा या सर्व नोट्स चा अभ्यास करा आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवा

संधी म्हणजे काय?

जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन एक नवीन वर्ण तयार होतो. या अशा एकत्रीकरण करण्याच्या प्रक्रियेस संधी असे म्हणतात.

उदा. 

  • सूर्य + उदय = सूर्योदय
  • अनाथ + आश्रम = अनाथाश्रम

संधीचे प्रकार – 

संधीचे 3 प्रकार खालील प्रमाणे आहे

  • स्वर संधी
  • व्यंजन संधी
  • विसर्ग संधी

स्वर संधी – 

संधी होताना एकत्र येणारे वर्ण जर स्वर असतील तर अशा संधीस स्वरसंधी असे म्हणतात. 

उदा.

  • कार्य + आरंभ = कार्यारंभ ( इथे अ आणि आ हे दोन स्वर एकत्र आले आहेत.
  • मत + ऐक्य = मतैक्य ( इथे अ आणि ऐ हे दोन स्वर एकत्र आले आहेत.

व्यंजन संधी – 

संधी होताना एकत्र येणाऱ्या वर्णामध्ये पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर अशा संधीस व्यंजन संधी असे म्हणतात.

उदा.

  • आपद् + काल = आपत्काल ( इथे द् हे व्यंजन आणि आ हा स्वर एकत्र आले आहेत )
  • रत्न + छाया = रत्नच्छाया ( इथे अ हा स्वर आणि छ हे व्यंजन एकत्र आले आहेत )

विसर्ग संधी – 

संधी होताना एकत्र येणाऱ्या वर्णामध्ये पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर अशा संधीस विसर्ग संधी असे म्हणतात.

उदा.

  • यश: + धन = यशोधन ( इथे अ: हा विसर्ग आणि ध् या व्यंजनाची संधी झाली आहे )
  • नम: + आकार = नमस्कार ( इथे अ: हा विसर्ग आणि आ या स्वराची संधी झाली आहे )

संधी आणि संधीचे प्रकार Question Set

या प्रकरणावर आधारित खालील टेस्ट सोडवा आणि तुमचा किती अभ्यास झाला आहे हे बघा


किती मार्क्स मिळाले मित्रांनो ? तुमचे मार्क्स पटापट कंमेंट करून सांगा – बघू कोणाचा किती अभ्यास झाला आहे ?

1 thought on “संधी आणि संधीचे प्रकार”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!