नातेसंबंध भाग 02Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. प्रेरणा ही गौरवच्या मामाची मुलगी आहे श्वेता ही गौरव च्या आत्याची मुलगी आहे तर श्वेताच्या मामाची मुलगी प्रेरणाची कोण असेल ? आत्येबहिण मावसबहिण मामेबहिण आत्या 2. केदारची मामेबहिण ऋतुराजच्या वडिलांची बायको आहे तर ऋतुराजचा मामा केदारचा कोण लागेल ? मामेभाऊ मामा भाऊ मावसभाऊ 3. यश साईच्या आत्याला आई म्हणतो तर साईच्या बहिणीचा चुलता यशच्या आईचा कोण असेल ? नवरा मामा वडिल भाऊ 4. लताच्या वहिनीचा मुलगा लताच्या आईच्या एकुलत्या एक मूलाचा कोण लागेल ? भाचा मुलगा पुतण्या भाऊ 5. श्यामलला 2 बहिणी आहेत तिच्या लहान बहिणीच्या मामेभावाची आत्या ही तिच्या मोठ्या बहिणीची कोण असेल ? मामी चुलती आत्या आई 6. संदीपच्या बायकोच्या नणंदेची मुलगी ही संदीपची कोण लागेल ? बहीण भाची पुतणी यापैकी नाही 7. राधिका स्वराजला म्हणते तुझी आई माझ्या बहिणीची मामी लागते तर तुझी बहिण माझ्या बहिणीची कोण लागेल ? आत्या आत्येबहिण मामी मामेबहिण 8. जयश्रीचा दीर रचनाचा भाऊ आहे तर रचनाच्या एकुलत्या एक दीराचा भाऊ जयश्रीच्या सासूचा कोण लागेल ? मुलगा पुतण्या जावई दीर 9. एका स्त्रीची ओळख करून देताना गणेश म्हणाला ही माझ्या मावस बहिणीच्या आईची वहिनी आहे तर ती स्त्री गणेशची कोण असेल ? मावशी काकू आत्या मामी 10. श्रीकांत आणि विनोद हे दोघे भाऊ आहेत श्रीकांतची पुतणी ही विनोदच्या बहिणीला आत्या म्हणते तर विनोदची पुतणी श्रीकांतच्या बायकोला काय म्हणेल ? आई मामी आत्या काकू 11. विकासच्या चुलतीच्या नणंदेचा मुलगा हा विकासच्या वडिलांचा कोण लागेल ? पुतण्या मुलगा भाऊ भाचा 12. प्रणवचे वडील केतकीच्या मामेसासऱ्यांचे जावई आहेत तर केतकीच्या सासूबाई आणि प्रणवची आई यांचे नाते काय असेल ? सून आणि सासू मुलगी आणि आई आत्या आणि भाची मामी आणि भाची 13. अर्णवचे वडील रेश्माच्या वडिलांचे एकुलते एक जावई आहेत रेश्माची मुलगी अर्णवची छोटी बहिण आहे तर रेश्माची आई अर्णवच्या वडिलांची कोण ? आई काकू सासू आत्या 14. सोनालीची आई सानिकाच्या वडिलांची वहिनी आहे तर सानिकाची आई सोनालीची कोण ? आई चुलती (काकू) मावशी आत्या 15. राहुल स्नेहाला म्हणाला तुझ्या आईची एकुलती एक बहिण माझी मामी आहे तर तुझी मावशी माझ्या आईची कोण? भावजय मावशी बहीण नणंद Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
Panchashila Amit Bhadke 13