म्हणी आणि अर्थ 02Marathi Grammar - मराठी व्याकरण म्हणी आणि अर्थ 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय ? गैरसमजूतीत राहणे. कोल्ह्याला काकडी आवडते. अतिशय उताविळपणा दाखवणे. लहान लोक लहान गोष्टींनी खुश होतात. 2. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? ये रे कुत्र्या खा माझा पाय. एखादी गोष्ट फुगवून सांगणे. परिस्थिती पाहून वर्तन करणे. आपण होऊन संकट ओढवून घेणे. एकाला दुसरा वरचढ भेटणे. 3. वरातीमागून घोडे’ या म्हणीचा अर्थ काय होतो ? एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे. विश्वासघात करणे. वेळ निघून गेल्यावर काम करणे. आधी वरात पाठवणे आणि मग घोडे पाठवणे. 4. एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही सक्षम असतो – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. खऱ्याला मरण नाही. खाऊ जाणे तो पचवू जाणे. गाढवाच्या पाठीवर गोणी. कुडी तशी फोडी. 5. म्हण पूर्ण करा. ……. गेला लुटी आणल्या दोन मुठी. साप बेडूक ससा उंदीर 6. एका खांद्यावर द्वारका – या म्हणीचा अर्थ काय होतो ? खूप निर्बुद्ध लोकांमध्ये एखादा शहाणा. यापैकी नाही. एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. प्रत्येक मनुष्य त्याच्या क्षमतेनुसार काम करतो. 7. चोरावर मोर म्हणजे – एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे. अतिशय दुराग्रहाचे किंवा हट्टाचे वागणे. यापैकी नाही. मोराने चोरावर चढणे. 8. खाली दिलेले वाक्य पूर्ण करा. अतिश्रीमंतीमुळे आमच्या शेजारील गृहस्थांना ….. ची बाधा झाली. ब क ग प 9. गरजेल तो पडेल काय ? – या म्हणीचा काय अर्थ होतो ? नको तिथे नको ती गोष्ट करणे. वाईटात आणखी वाईट घडणे. केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही. पाऊस गरजला की तो पडतो. 10. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. अठरा नखी …….. राखी वीस नखी घर राखी. खेटरे दार घर पार 11. घेता …….. देता शिमगा – म्हण पूर्ण करा. दिवाळी संक्रांत होळी पोळी 12. ओठात एक आणि पोटात एक – या म्हणीचा अर्थ काय होतो ? क्षणात खरे आणि क्षणात खोटे बोलणे. एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळे विचार करणे. मनातील हेतू आणि बोलून दाखवलेला विचार यात तफावत असणे. शहाणपणाचे सोंग आणणे. 13. चुकीचा पर्याय निवडा. बाप तैसा बेटा – बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे. चोराच्या उलट्या बोंबा – स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे. सर्व पर्याय योग्य आहेत. तुकारामबुवाची मेख – सोपी गोष्ट 14. पुढील म्हणीचा अर्थ सांगा. कामापुरता मामा मामाकडून भरपूर काम करून घेणे. अतिशय उतावळेपणाची स्थिती. आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या टाकणे. 15. अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे – या म्हणीचा अर्थ काय आहे ? फक्त स्वतःचा फायदा करून घेणे. गरजेपेक्षा जास्त जेवण केल्याने त्रास होतो. कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच. दागिण्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि नंतर जन्मभर फेडत बसायचे Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14/15