Cases and Its Types in Marathi Grammar is one of the important chapter for All Competitive Exams Like MPSC , Police Bharti , Talathi Bharti
All Important Points
Solve All the Important Questions of Marathi Grammar based on Topic : Cases and Its Types in Marathi Grammar. This is Marathi Grammar Test useful for MPSC , Police Bharti , Talathi Bharti , Van rakshak Bharti , Arogya Sevak Bharti , Post Bharti and Krushi Sevak Bharti
Question Set Based On विभक्ती प्रत्यय आणि कारकार्थ
या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी खाली दिलेल्या संपूर्ण नोट्स वाचा आणि मग यावर आधारित प्रश्नसंच सोडवा
विभक्ती –
नाम आणि सर्वनाम यांचा क्रियापद आणि इतर शब्दांशी असणारा संबंध ज्या विकारांद्वारे व्यक्त होतो त्यांना विभक्ती असे म्हणतात.
उदा.
- देवाला विचारले – इथे विचारणे या क्रियापदासोबत देव या शब्दाचा संबंध आहे.
- रामाने रावणाला मारले – इथे मारणे या क्रियापदासोबत आणि रावण या दोन्ही शब्दांचा संबंध आहे.
या प्रकरणावर आधारित खालील टेस्ट सोडवा आणि तुमचा किती अभ्यास झाला आहे हे बघा
प्रत्यय –
शब्दाचा विभक्तीयुक्त रूप तयार करताना त्यांना जे अक्षर जोडले जातात त्या अक्षरांना प्रत्यय म्हणतात.
उदा.
- देवाला – देव शब्दाला ‘ ला ‘ हे अक्षर जोडले गेले म्हणून ‘ ला ‘ हे प्रत्यय आहे.
- रामाने – राम शब्दाला ‘ ने ‘ हे अक्षर जोडले गेले म्हणून ‘ ने ‘ हे प्रत्यय आहे.
सामान्यरूप –
विभक्तीचे प्रत्यय लावण्याआधी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात.
म्हणजेच मूळ शब्दात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात.
उदा. – देवाने या शब्दाचे उदाहरण घेऊ.
- मूळ शब्द : देव
- सामान्य रूप : देवा
- विभक्तीयुक्त रूप : देवाने
उदा. – रामाने या शब्दाचे उदाहरण घेऊ
- मूळ शब्द : राम
- सामान्य रूप : रामा
- विभक्तीयुक्त रूप : रामाने
विभक्तीचे प्रकार –
मराठी भाषेत 8 विभक्ती मानल्या जातात
- प्रथमा
- द्वितीया
- तृतीया
- चतुर्थी
- पंचमी
- षष्ठी
- सप्तमी
- संबोधन
विभक्ती विभक्तीचे प्रत्यय आणि कारकार्थ
विभक्ती विभक्तीचे प्रत्यय आणि कारकार्थ खालील चार्ट मध्ये दिले आहेत.
आता आपण प्रत्येक विभक्ती विस्तृत स्वरुपात पाहू
प्रथमा नामांना कोणतेही प्रत्यय नसेल तर ते प्रथमा विभक्तीत असतात.
प्रथमा विभक्तीला एकवचन आणि अनेक यात प्रत्यय नसतात
उदा.
- सुरेश उठून गेला – या वाक्यातील सुरेश या शब्दाला कोणताही प्रत्यय नाही म्हणून त्याची विभक्ती प्रथमा आहे.
- काकांनी पेरू आणला – या वाक्यातील पेरू या शब्दाला कोणतेही प्रत्यय नाही म्हणून त्याची विभक्ती प्रथमा आहे परंतु काका या शब्दाला प्रत्यय आहे म्हणून तो शब्द प्रथमा विभक्तीत नाही
द्वितीया
वाक्यातील कर्माला प्रत्यय लागलेले असल्यास ते द्वितीया विभक्तीत असते.
कर्म सोडून कोणत्याही शब्दाची विभक्ती द्वितीया नसते
द्वितीया विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय – स ला ते
द्वितीया विभक्तीचे अनेकवचनातील प्रत्यय – स ला ना ते
उदा.
- रामाने रावणाला मारले – यातील रावण या शब्दाला ला हा प्रत्यय लागला आहे म्हणून त्याची विभक्ती द्वितीया आहे
- आजीने नातवास सांगितली – या वाक्यातील या शब्दाला स हा प्रत्यय लागला आहे म्हणून त्याची विभक्ती द्वितीया आहे.
तृतीया
क्रिया कोणत्या साधनाने केली? कोणी केली? आणि कोठे झाली? हे दाखवणारे नाम जर ने ए शी नी या प्रत्ययानी जोडले गेले असेल तर ते नाम तृतीया विभक्तीत असते
तृतीया विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय – ने ए शी
तृतीया विभक्तीचे अनेकवचनातील प्रत्यय – नी शी ई ही
उदा.
- मुलाने अभ्यास केला – मुल या शब्दाला ने हा प्रत्यय लागला आहे म्हणून त्याची विभक्ती तृतीया आहे
- तो मनाने श्रीमंत आहे – मन या शब्दाला ने हा प्रत्यय लागला आहे म्हणून त्याची विभक्ती तृतीया आहे
चतुर्थी
वाक्यातील कर्त्याला जर स ला ना ते हे प्रत्यय लागलेले असतील तर तो चतुर्थी विभक्तीत असतो.
वाक्यात दान स्वीकारणारे कर्म चतुर्थी विभक्तीत असते
चतुर्थी विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय – स ला ते
चतुर्थी विभक्तीचे अनेकवचनातील प्रत्यय – स ला ना ते
उदा.
- राजाने चोराला दोन सहस्त्र मुद्रा दिल्या – या वाक्यात चोर मुद्रा स्वीकारत आहे आणि या शब्दाला ला हे प्रत्यय लागले आहे म्हणून त्याची विभक्ती चतुर्थी आहे
- माझ्या हाताला मार लागला आहे – या वाक्यातील हात या शब्दाला ला हे प्रत्यय लागले आहे म्हणून त्याची विभक्ती चतुर्थी आहे
पंचमी
वाक्यातील नामाला ऊन हून हे प्रत्यय लागले असतील तर नाम पंचमी विभक्तीत मानले जाते.
या मधून दुरावा अभियोग दाखवला जातो
पंचमी विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय – ऊन हून
पंचमी विभक्तीचे अनेकवचनातील प्रत्यय – ऊन हून
उदा.
- सिंह गुहेतून बाहेर पडला – गुहा या शब्दाला ऊन हा प्रत्यय लागला आहे म्हणून त्या शब्दाची विभक्ती पंचमी आहे
- पुण्याहून मुंबई मोठी आहे – पुणे या शब्दाला हून हा प्रत्यय लागला आहे म्हणून त्या शब्दाची विभक्ती पंचमी आहे
षष्ठी
शब्दांचा एकमेकांशी संबंध हा चा ची चे च्या या शब्दांद्वारे दाखवले गेले असल्यास त्या शब्दाची विभक्ती षष्ठी मानतात.
षष्ठी विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय – चा ची चे च्या
षष्ठी विभक्तीचे अनेकवचनातील प्रत्यय – चा ची चे च्या
उदा.
- राजाचा पोशाख छान आहे – राजा या शब्दाला चा हा प्रत्यय लागला आहे म्हणून त्याची विभक्ती षष्ठी मानली जाते
- देशाचा विचार करून त्याने आपले घर सोडले – देश या शब्दाला चा हा प्रत्यय लागला आहे म्हणून त्याची विभक्ती षष्ठी मानली जाते
सप्तमी
स्थळ वेळ साधन हे दाखवणारे नामांना जर त ई आ हे प्रत्यय लागले असतील तर ते नाम सप्तमी विभक्तीत मानतात
सप्तमी विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय – त ई आ
सप्तमी विभक्तीचे अनेकवचनातील प्रत्यय – त ई आ
उदा.
- बाळ सकाळी उठले – सकाळी या शब्दांमध्ये सकाळ या शब्दाला ई हा प्रत्यय लागला आहे म्हणून त्याची विभक्ती सप्तमी आहे
- वाड्यात खूप अंधार आहे – वाडा या शब्दाला त हा प्रत्यय लागला आहे म्हणून या शब्दाची विभक्ती सप्तमी आहे
संबोधन
हाक मारण्यासाठी या विभक्तीचा उपयोग होतो
संबोधन विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय – प्रत्यय नाही
संबोधन विभक्तीचे अनेकवचनातील प्रत्यय – नो
उदा.
- वृषाली, माझे ऐक – मुलीला हाक मारण्यासाठी वृषाली असे संबोधले आहे म्हणून त्याची विभक्ती संबोधन आहे
- मुलांनो खाली बसा – मुलांना संबोधण्यासाठी नो हा प्रत्यय लागला आहे म्हणून त्याची विभक्ती संबोधन आहे.
Like so much
14