Best Books for Police Bharti – पोलीस भरतीसाठी पुस्तकांची यादी
Maharashtra Police भरतीची तयारी करणारे बरेच मित्र मला एकच प्रश्न नेहमी विचारताना दिसतात. तो म्हणजे Maharashtra Police भरतीसाठी कोणते पुस्तके चांगले आहे? [ Best Books for Police Bharti ]
Maharashtra Police भरतीची Book List बनवताना मार्केटमध्ये असणारे पुस्तके बघितली असता कोणते पुस्तके विकत घ्यायचे? कोणती पुस्तके चांगली आहेत हे ठरवताना खूप गोंधळ होतो.
All Important Points
आणि मग आपण आपल्या आधी ज्यांनी तयारी सुरू केली आहे किंवा आपल्याला असे वाटते ज्यांचा अभ्यास चांगला आहे अशा मित्रांना कोणते पुस्तक विकत घेऊ असा प्रश्न विचारतो आणि या प्रश्नाचे उत्तर म्हणून प्रत्येकजण वेगवेगळ्या पुस्तकाचे नाव सांगतो.
प्रत्येकजण पुस्तकाची काहीतरी खासियत सांगतो मग मार्केटमध्ये असणारे सर्वच पुस्तके चांगले वाटू लागतात.
परंतु म्हणून मी सर्व पुस्तकं विकत घ्यायची का?
तर बिलकुल नाही.
मग नेमके कोणते पुस्तक विकत घ्यायचे हे कसं ठरवायचं? कोणीतरी सांगतो म्हणून पुस्तक विकत घेणे हे खरंतर चुकीचे आहे.
आपण अभ्यासाच्या कोणत्या पायरीवर आहोत याचा विचार करून जर तुम्ही पुस्तक विकत घेतले तरच त्या पुस्तकाचा तुम्हाला फायदा होईल.
मार्केटमध्ये असणाऱ्या पुस्तकांचा अभ्यास करून मी आपल्यासाठी हे काम अतिशय सोपं केलं आहे.
तुमचा अभ्यास किती झाला आहे, तुम्ही नुकतीच सुरुवात केली आहे की अजून त्याच्यापुढे जाऊन तुमची तयारी सुरू आहे याचा विचार करून काही पुस्तकांची यादी मी बनवली आहे.
मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये Maharashtra Police भरतीसाठी Book List तुम्हाला वाचायला मिळेल.
आणि हो हे केवळ माझ्या एकटीच मत नाही तर जवळपास 29114 मित्रांच्या मतानुसार ही Book List बनवली आहे.
Maharashtra Police भरतीसाठी Best Book List कशी तयार करण्यात आली आहे? [ Best Books for Police Bharti ]
खूप दिवसांपासून अभ्यास करणाऱ्या मित्रांना एक पुस्तक सारखे सारखे वाचून कंटाळा येतो आणि त्यातून ते एकाच विषयाचे वेगवेगळी पुस्तके वापरायला सुरुवात करतात. एकाच विषयाचे अनेक पुस्तके वापरल्यानंतर कोणत्या विषयासाठी कोणतं पुस्तक Best आहे हे त्यांना आपोआप समजतं.
ही List बनवताना अगदी याचाच विचार करण्यात आलेला आहे.
1,50,000 पेक्षा जास्त सदस्य संख्या असणाऱ्या Maharashtra Police भरतीच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये खालील प्रश्न विचारण्यात आले होते
- गणितासाठी कोणतं पुस्तक Best आहे?
- बुद्धिमत्ताचा अभ्यास कोणत्या पुस्तकातून करायला हवा?
- मराठी व्याकरण कमी वेळात आणि पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी कोणत्या पुस्तकातून वाचावे?
- आणि सामान्य अध्ययन सारखा विषय कोणत्या पुस्तकात चांगल्याप्रकारे कव्हर होईल?
मित्रांनो पुस्तकाची यादी बनवताना अभ्यास करणाऱ्या जवळपास 29114 मित्रांचे मत मी विचारात घेतले आहे.
आणि विशेष बाब म्हणजे पहिल्या 24 तासात 16000 पेक्षा जास्त मित्रांनी आपले मत नोंदवले होते.
ठराविक विषयांमध्ये टॉपचे चार पुस्तके निवडून Maharashtra Police भरतीच्या 1,50,000 सदस्य असणाऱ्या ग्रुपमध्ये पुस्तकांच्या यादीवर छोटेसे मतदान घेण्यात आले.
बघूया मग कोणत्या विषयासाठी कोणते पुस्तक चांगले आहे?
गणित विषयासाठी पुस्तक : [ Best Books for Police Bharti Mathematics ]
गणित विषयासाठी पुस्तक निवडायचे असेल तर त्यात पुस्तकाची मांडणी, विस्तृत स्पष्टीकरण, सोडवण्यासाठी भरपूर उदाहरणे, काठिण्यपातळी नुसार पाठ्यक्रम ची रचना यासारखे बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. आणि या सर्व मुद्द्यांचा विचार करून गणितासाठी पुस्तक निवडले आहे
गणितासाठी सध्या चार पुस्तके खूप चर्चेत आहे
ते खालील प्रमाणे आहे-
- नितीन महाले सर [ Magic of Mathematics ]
- सतीश वसे सर [ Fastrack Maths ]
- पंढरीनाथ राणे सर [Sampurna Ganit ]
- अजय चव्हाण सर.
या चार पुस्तकांवरती 7261 मित्रांनी आपले मत नोंदवले. आणि यातून सर्वात जास्त पसंती सतीश वसे सर [ Fastrack Maths ] यांना मिळाली. वसे सरांचे FASTRACK MATHS हे पुस्तक तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये खूप प्रसिद्ध असल्याचे या पोलमधून लक्षात येते.
घेण्यात आलेल्या पोलचा निकाल याप्रमाणे होता.
या पोल नुसार काय लक्षात यायला हवे ?
तर शेवटचे पुस्तक सोडता वरील तीनही पुस्तक कमी-अधिक प्रमाणात प्रसिद्ध आहेत.
मग तुम्ही कोणते पुस्तक विकत घ्यायला हवे हे कसे ठरवणार?
तुमच्या शिकण्याच्या पद्धती नुसार तुम्ही कोणतं पुस्तक वापरायचं हे ठरवू शकतात!
तुम्हाला गणिताचा अभ्यास कसा करायचा याबद्दल एक जबरदस्त आर्टिकल वाचायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करून वाचा : गणिताचा अभ्यास कसा करायचा
नितीन महाले सर [ Magic of Mathematics ] –
अतिशय सुटसुटीत मांडणी केलेलं हे पुस्तक आहे.
काठिण्यपातळी नुसार गणित शिकवत जाणारे हे पुस्तक आहे.
तुम्ही आताच गणिताच्या अभ्यासाला सुरुवात केली असेल तर हे पुस्तक तुम्ही वापरू शकता.
काही ठिकाणी शॉर्टकट तर काही ठिकाणी नियम या पद्धतीने या पुस्तकात गणिते सोडवून दिली आहेत.
तुम्ही नुकतीच अभ्यासाला सुरुवात केली असेल आणि अभ्यासाचे जास्त टेन्शन न येता तुम्हाला अभ्यास सुरू ठेवायचा असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.
सतीश वसे सर [ Fastrack Maths ] –
प्रकारानुसार गणित शिकवणारे हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे.
शिकत शिकत जसे तुम्ही पुढे जाल तसे तसे नवीन नवीन प्रकार तुम्हाला हे पुस्तक शिकवत जाते.
शिवाय शिकलेल्या गोष्टी लक्षात आहे की नाही हे बघण्यासाठी या पुस्तकात प्रकारानंतर लगेचच सोडवायला उदाहरणेही दिली आहेत.
प्रकारच्या माध्यमातून गणित शिकण्याची तुमची अभ्यासाची पद्धत असेल तर हे पुस्तक तुम्ही विकत घ्यायला हरकत नाही.
शिवाय या पुस्तकात दिलेले शॉर्टकट तुम्हाला गणित खूप सोपे करून देईल.
पंढरीनाथ राणे सर [ Sampurna Ganit ] –
प्रकार शिका आणि लगेच सराव करा यासाठी हे पुस्तक.
भरपूर उदाहरणे आणि सराव यासाठी हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
काठिण्यपातळी नुसार गणिताची मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
या वरील पुस्तकातून अभ्यास कसा करायचा?
सर्वात आधी तुमची शिकण्याची पद्धत ओळखा.
- तुम्ही प्रकारानुसार शिकत असाल तर वसे सरांचे पुस्तक वापरा.
- सुटसुटीत मांडणी, सोप्या पद्धती साठी महाले सरांचे पुस्तक वापरायला हवे.
- भरपूर सराव राणे सरांच्या पुस्तकातून करायला हवा.
- वरीलपैकी एका पुस्तकातील गणिते सोडवून झाली की तुम्ही राहिलेल्या पुस्तकातून गणिते सोडवायचा प्रयत्न करा.
क्रमांक | पुस्तकाचे नाव | क्लिक करून विकत घ्या |
1 | नितीन महाले सर – Magic of Mathematics | Buy Now |
2 | सतीश वसे सर – Fastrack Maths | Buy Now |
3 | पंढरीनाथ राणे सर – Sampurna Ganit | Buy Now |
मराठी विषयासाठी पुस्तक [ Best Books for Police Bharti Marathi ]
मराठी हा सर्वात सोपा विषय. मराठी व्याकरण आणि शब्द संपत्ती या दोन गोष्टी वरती स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात.
या विषयाचे पुस्तक निवडतांना विशेष मेहनत घ्यावी लागत नाही कारण मराठी ही मातृभाषा असल्यामुळे आपण त्यातल्या संकल्पना अगदी सहजपणे समजू शकतो.
पण तरीही त्यातला त्यात कोणते पुस्तक चांगले आहे हे बघू.
मराठी विषयासाठी Best Book या कॅटेगरीमध्ये तीन पुस्तके प्रसिद्ध आहेत. –
- बाळासाहेब शिंदे सर [ Paripurna Marathi Vyakaran ]
- मो रा वाळिंबे [ Sugam Marathi Vyakaran With Shabdratn ]
- दीपस्तंभ मराठी व्याकरण
या तीन पुस्तकांपैकी एक पुस्तक निवडणे खूप अवघड नाही.
कारण या पोल मध्ये भाग घेतलेल्या 7289 मित्रांपैकी 4009 मित्रांना बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक Best वाटतं.
बाळासाहेब शिंदे सर [ Paripurna Marathi Vyakaran ] यांचे पुस्तक
55 टक्के लोकांनी या एकाच पुस्तकाला पसंती दिली आहे
त्याचं कारणही खास आहे –
या पुस्तकात मराठी व्याकरणाची खूप सुंदर अशी मांडणी केली आहे.
आणि फक्त मांडणीच नाही तर सरावासाठी भरपूर उदाहरणे दिली आहेत
जर समजा या सर्व उदाहरणांचा तुमचा अभ्यास झाला तर एकही प्रश्न बाहेरून येणार नाही.
विभक्ती सारखा कठीण टॉपिक शिंदे सर यांच्या पुस्तकात आकृतीच्या साहाय्याने खूप सोपा करून समजून सांगितला आहे.
मो रा वाळिंबे यांचे पुस्तक कोणी वापरायचं ?
मराठी व्याकरणावर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शिंदे सरांच्या पुस्तका पूर्वी जर कोणते परिपूर्ण पुस्तक असेल तर ते मो रा वाळिंबे यांचं होतं.
मराठी व्याकरणाचा सखोल अभ्यास करणाऱ्या मित्रांसाठी हे पुस्तक आजही खूप महत्त्वाच आहे
या पुस्तकात उदाहरणा ची संख्या खूप नाही मात्र तरीही दुसऱ्या पुस्तकात प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आल्याने ही कमतरता भरून निघते.
फक्त एकाच विषयाची दोन पुस्तके तुम्हाला यामध्ये हाताळावी लागतील हे लक्षात घ्यायला हवे.
तुम्ही कोणते पुस्तक वापरणार हे कसं ठरवायचं?
मी या ठिकाणी मित्रांनी दिलेल्या पोल सोबत जाऊ इच्छिते –
Maharashtra Police भरतीसाठी तरी शिंदे सरांचे पुस्तक Best आहे.
भरपूर उदाहरणांमुळे तुमची मराठी व्याकरणाची चांगली तयारी होऊ शकते.
पण तरीही सखोल अभ्यास करणाऱ्या मित्रांनी शिंदे सरांच्या पुस्तकानंतर मो रा वाळिंबे यांचे पुस्तक वापरायला हवे.
शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे.
मराठी व्याकरण विषयाचा सराव कसा करावा?
मराठी व्याकरण विषयाचा अभ्यास करण्यासोबत प्रश्नपत्रिका सोडविण्याचाही सराव करायला हवा
हा सराव करण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करू शकता इथे तुम्हाला भरपूर दर्जेदार प्रश्न सोडवायला मिळेल
बुद्धिमत्ता चाचणी साठी पुस्तके- [ Best Book for Police Bharti Reasoning ]
बुद्धिमत्ता चाचणी विषय परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवून देतो आणि हाच विषय असतो जो आपल्याला मेरिटमध्ये येण्यास मदत करतो. परंतु ह्या विषयाची एक खास गरज आहे – ती म्हणजे या विषयाचे भरपूर उदाहरणे सोडवायला हवे. सरावासाठी खूप उदाहरणे असलेले पुस्तक या विषयासाठी योग्य ठरेल.
पण मला विचाराल तर या विषयाचा अभ्यास करताना एकच पुस्तकावरती अवलंबून राहू नका.
बुद्धिमत्ता चाचणीसाठी खालील पुस्तके प्रसिद्ध आहेत –
सतीश वसे सर [ Fastrack Buddhimatta ]
अनिल अंकलगी सर [ Buddhimapan Chachni ]
पंढरीनाथ राणे सर [ Sampurna Buddhimatta Chachni ]
ज्ञानदीप प्रकाशन.
बुद्धिमत्ता चाचणी हा विषय खरतर पूर्णपणे सरावाचा. यामध्ये सूत्रे ,टेक्निक्स ,सोडवण्याच्या पद्धती यासारख्या गोष्टी खुप नसतात.
एकदा एखादे उदाहरण कसे सोडवायचे हे जर समजलं तर त्यात शिकण्यासाठी काही नसते. भरपूर सराव मात्र करायला हवा.
आणि म्हणूनच एकच Best Book या विषयासाठी सांगणे कठीण आहे.
7039 मित्रांनी दिलेल्या पसंतीनुसार –
- अनिल अंकलगी यांचे पुस्तक सर्वाधिक पसंतीस उतरले आहे
- यानंतर सतीश वसे सर [ Fastrack Maths ] यांचे पुस्तक आहे
- आणि खूप थोड्या फरकाने तिसऱ्या क्रमांकावर पंढरीनाथ राणे [ Sampurna Buddhimatta Chachni ] यांचे पुस्तक आहे.
परंतु वरती दिलेल्या तिन्ही पुस्तकांना मिळालेल्या मतांमध्ये जास्त फरक नाही.
मी तर प्रत्येक वेळेस सांगते की बुद्धिमत्ता चाचणी या विषयाच्या अभ्यासासाठी जास्तीत जास्त उदाहरणे सोडविण्याचा प्रयत्न करा.
आणि जास्तीत जास्त उदाहरणे सोडवण्यासाठी तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पुस्तके असली पाहिजे.
तुम्ही तयारी करताना कोणत्याही पुस्तका पासून सुरुवात करू शकतात
साधारणपणे या पुस्तकांमध्ये दिलेले स्पष्टीकरण जवळपास सारखेच आहे. त्यामुळे कोणतेही पुस्तक आधी अभ्यासाला घेतले तरी फरक पडणार नाही.
पण जर मला विचाराल तर माझा क्रम याप्रमाणे असेल –
सतीश वसे सर [ Fastrack Maths ] यांचे पुस्तक –
या पुस्तकाची मांडणी खूपच सुटसुटीत आहे त्यामुळे अभ्यास करताना अभ्यासाचे दडपण येणार नाही.
शिवाय दिनदर्शिका, दिशा, घड्याळ यासारख्या प्रकरणांसाठी या पुस्तकांमध्ये छोट्या छोट्या ट्रिक्स दिल्या आहे. काही ट्रिक्स खरंच चांगल्या आहेत.
उदाहरणार्थ घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यातील कोन काढणे –
पंढरीनाथ राणे सर [ Sampurna Buddhimatta Chachni ] यांचे पुस्तक –
या पुस्तकात त्यामानाने बरीच माहिती आणि बरेच उदाहरणे आहेत. व्यवस्थित बघितले तर वयवारी सारखे गणिताचे उदाहरणेही या पुस्तका मध्ये दिलेले आहेत.
समसंबंध शोधा , वेगळा पर्याय शोधा, संख्या मालिका पूर्ण करा, अंक मालिका पूर्ण करा या प्रकरणाच्या उदाहरणांची या पुस्तकातून चांगली तयारी होईल.
आणि या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे वरील प्रकरणाचे बरेच उदाहरणे आणि बरीच माहिती या पुस्तकात दिली आहे.
अनिल अंकलगी सर [ Buddhimapan Chachni ] यांचे पुस्तक –
या पुस्तकात सुद्धा सरावासाठी भरपूर उदाहरणे आहेत. बुद्धिमत्ता चाचणी च्या तयारीसाठी हे पुस्तक विद्यार्थ्यांमध्ये भरपूर प्रसिद्ध आहे.
तुम्ही कोणते पुस्तक विकत घ्यायला पाहिजे?
बुद्धिमत्तासाठी सर्व पुस्तक विकत घेण्यापेक्षा एक पुस्तक तुम्ही विकत घ्या एक पुस्तक तुमच्या मित्राला विकत घ्यायला सांगा. असे केल्याने तुमचे पैसे तर वाचतील पण त्याचबरोबर तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणे सोडवायला मिळेल.
आणि जर तुम्हाला पुस्तक विकत घ्यायचे असेल तर पंढरीनाथ राणे या एका पुस्तकासोबत तुम्ही उरलेल्या पुस्तकातून कोणतेही एक पुस्तक वापरू शकता.
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यासाठी पुस्तके : [ Best Book for Police Bharti Gk ]
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हा विषय खूप मोठा आहे. सामान्य ज्ञान मध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, पंचायतराज, अर्थशास्त्र, विज्ञान, समाजसुधारक, राज्यघटना असे बरेच घटक आहे.
Maharashtra Police भरतीची तयारी करणारे बरेच मित्र जेव्हा एखाद्या अभ्यासू मित्राला सामान्य ज्ञान या विषयासाठी पुस्तक विचारतो त्यावेळी त्याला प्रत्येक घटकासाठी एक पुस्तक सांगितले जाते.
परंतु पोलिस भरतीत प्रत्येक घटकासाठी एक पुस्तक घेण्याची गरज नाही
फक्त Maharashtra Police भरती चा विचार केला तर वरील सर्व घटक असणारे काही पुस्तके खाली दिली आहे. या पुस्तकांमधून Maharashtra Police भरतीसाठी सामान्यज्ञान या विषयाचा पूर्ण अभ्यास होऊ शकतो.
वरील सर्व घटक असणारे विचार पुस्तके खालील प्रमाणे आहे –
- प्रकाश गायकवाड यांचे पुस्तक
- के सागर यांचे पुस्तक
- तात्यांचा ठोकळा
- स्टडी सर्कल ठोकळा
तात्यांचा ठोकळा सर्वात चांगले पुस्तक
या सर्व पुस्तकांमध्ये, 7525 उमेदवारांपैकी 53% उमेदवारांना तात्यांचा ठोकळा हा सामान्य ज्ञान या घटकासाठी पुरेसा आहे असं वाटतं.
कारण इतर पुस्तकांच्या तुलनेत या पुस्तकाचा अभ्यास करणे सुटसुटीत वाटते.
या पुस्तकाचे दोन प्रकार सध्या उपलब्ध आहेत.
Maharashtra Police भरतीसाठी तात्यांचा ठोकळा
पीएसआय एसटीआय असिस्टंट साठी तात्यांचा ठोकळा
या दोन पुस्तकांपैकी मात्र मी पीएसआय एसटीआय असिस्टंट यासाठी असणारा तात्यांचा ठोकळा विकत घेणे पसंत करेन.
कारण नेहमी अपडेट होणाऱ्या पुस्तकांपैकी ते पुस्तक आहे.
माझ्याकडे सध्या नुकतीच उपलब्ध झालेली आवृत्ती आहे ज्यामध्ये मराठा आरक्षण, कलम 370 यासारख्या नवीन त्या गोष्टींचा समावेश आहे.
हे पुस्तक जरी पीएसआय एसटीआय असिस्टंट साठी असेल तरी हे पुस्तक Maharashtra Police भरतीच्या उमेदवारांना मी वाचायला सांगते
कारण हे एक परिपूर्ण पुस्तक आहे.
इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र हे विषय Maharashtra Police भरतीला खूप सखोल अभ्यासण्याची गरज नाही.
म्हणून प्रत्येक घटकासाठी जर तुम्हाला कोणी वेगळे पुस्तक घ्या तुम्ही सांगत असेल तर त्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नका कारण हे सगळे वेगवेगळी पुस्तके तुम्ही वाचत असाल तर तुमचा खूप वेळ वाया जाईल.
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयाला फक्त 25% भारांश आहे
आता विषय असा आहे की Maharashtra Police भरतीसाठी हे पुस्तक कसे वापरायचे –
- या पुस्तकात भरपूर माहिती दिलेली आहे मात्र तरीही तुम्हाला अभ्यास करताना सर्व माहिती लक्षात ठेवण्याची गरज नाही. उदा. या पुस्तकात सर्व पंचवार्षिक योजना आणि त्याबद्दल संबंधित आकडेवारी दिलेली आहे. परंतु Maharashtra Police भरतीला इतके deep विचारणार नाही. त्यामुळे ती आकडेवारी पाठ करत बसू नका.
- बऱ्याच समाजसुधारकांची माहिती दिली आहे परंतु त्या सर्वांचा अभ्यास Maharashtra Police भरतीसाठी नाही त्यामुळे फक्त महत्त्वाचे समाजसुधारक आणि त्यांच्या संस्था त्यांचे जन्म ठिकाण टोपणनाव आणि थोड्याफार प्रमाणात त्यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य इतकाच अभ्यास करा.
- राज्यघटनेचे सर्व कलम तुम्हाला माहीत असले पाहिजे असे नाही – अभ्यास करताना महत्वाचे कलम यांचा अभ्यास करा. जसे की बालकामगार बंदी, अस्पृश्यता, मूलभूत हक्क.
- अभ्यास करताना भारताच्या भूगोल ऐवजी महाराष्ट्राच्या भूगोलावरती जास्त focus करा.
Maharashtra Police भरती परीक्षेत कोणत्या विषयात नेमका काय अभ्यास करायला पाहिजे हा एक स्वतंत्र आर्टिकल चा विषय आहे.
लवकरच याबद्दल एक आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळेल.
पोलमध्ये असणाऱ्या इतर पुस्तकांबद्दल काय?
मित्रांनो मला तरी असं वाटतं, जर मी फक्त Maharashtra Police भरतीसाठी सध्या अभ्यास करत असाल तर वरती सांगितलेच पुस्तक वापरा.
या List मध्ये असणारे पुस्तके चांगले आहे परंतु Maharashtra Police भरतीचा विचार केला तर मला तात्यांचा ठोकळा हे एकमेव पुस्तक चांगले वाटते.
प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी पुस्तक – [ Best Books for Police Bharti Previous years Question Paper Practice ]
घरी युद्धाची कितीही तयारी केली तरी प्रत्यक्ष मैदानात उतरल्या शिवाय युद्ध काय असते हे समजत नाही.
त्याचप्रमाणे वरती दिलेले चारही पुस्तके तुम्ही कितीही चांगल्या प्रकारे वाचले लक्षात ठेवले तरी जोपर्यंत तुमच्याकडे प्रश्नपत्रिकेचा सराव करण्यासाठी पुस्तक नसेल तोपर्यंत तुम्ही संपूर्ण रित्या स्पर्धेला सामोरे जाण्यास तयार असणार नाही.
Maharashtra Police भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या सरावासाठी खाली एक पुस्तक दिले आहे ते नक्की विकत घ्या आणि त्यातून दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवा.
ग्रुप मध्ये घेण्यात आलेल्या पोल नुसार आणि त्या पुस्तकांच्या अभ्यासानुसार मी Best Books For Police Bharti दिले आहे.
याव्यतिरिक्त तुम्ही वापरत असणारे एखादे चांगले पुस्तक असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा.
This is
Thanks mam khup help jali thanks mam mam upsc sathi pn book sanga
Sure Shubham, will be updated soon
Telegram channel link plz mam
Prashn patrika sarav sanch kuthla ghyaycha ????Plz
हो नोबेल मेगा सामान्य ज्ञान च पुस्तक सर्वोत्कृष्ट आहे
नगरकर सरांच्या नोट्स वापरा मराठी व सामान्य ज्ञान साठी नाशिक येथील सर्वात बेस्ट आहे….