Free :

अलंकार आणि अलंकाराचे प्रकार

अलंकार आणि अलंकाराचे प्रकार in Marathi Grammar is one of the important chapter for All Competitive Exams Like MPSC , Police Bharti , Talathi Bharti

Solve All the Important Questions of Marathi Grammar based on Topic : अलंकार आणि अलंकाराचे प्रकार This is Marathi Grammar Test useful for MPSC , Police Bharti , Talathi Bharti , Van rakshak Bharti , Arogya Sevak Bharti , Post Bharti and Krushi Sevak Bharti

भाषेची सौंदर्य वाढविण्यासाठी शब्दांची आणि अर्थाची केली जी रचना असते त्या रचनेला अलंकार असे म्हणतात.

अलंकाराचे खालील दोन प्रकार पडतात

शब्द आणि अर्थ यावरून अलंकाराचे खालील दोन प्रकार पडतात

 • अर्थालंकार – जर ही रचना अर्थाची केलेली असेल तर त्याला अर्थालंकार म्हणतात
 •  शब्दालंकार – जर ही रचना शब्दांची केलेली असेल तर त्याला शब्दालंकार म्हणतात

शब्दालंकाराचे उपप्रकार – 

 • अनुप्रास
 • यमक
 • श्लेष

अर्थालंकाराचे उपप्रकार – 

 • उपमा
 • उत्प्रेक्षा
 • अपन्हुती
 • अनन्वय
 • रूपक
 • अतिशयोक्ती
 • दृष्टांत
 • विरोधाभास
 • चेतनागुणोक्ती 
 • अर्थातरन्यास
 • स्वभावोक्ती
 • व्याजस्तुती
 • पर्यायोक्ती
 • सार
 • अन्योक्ती
 • ससंदेह
 • भ्रांतीमान
 • व्यतिरेक

अर्थालंकार समजण्याआधी तुम्हाला खालील गोष्टी माहित असल्या पाहिजेत.

 • उपमेय – मूळ वस्तू
 • उपमान – गुणाने अधिक असणारी वस्तू

आता प्रत्येक अलंकार विस्ताराने पाहू – 

अनुप्रास – 

कवितेच्या चरणात एका अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते

उदा.

 • बालिश बहु बायकात बडबडला – ब हे अक्षर खूप वेळा आला आहे

यमक – 

समान उच्चार असणारा शब्द वापरल्यामुळे नाद निर्माण केला जातो

उदा.

 • सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो

श्लेष – 

एकच शब्द दोन अर्थानी वापरला जातो.

 • श्रीकृष्ण नवरा मी नवरा, शिशुपाल नवरा मी न-वरी

उपमा – 

दोन वस्तूतील समानता दाखवण्यासाठी उपमा हा अलंकार वापरला जातो यासाठी सम सारखा हे शब्द वापरले जातात

उदा.

 • अमृतासारखे गोड पाणी आहे

उत्प्रेक्षा – 

उपमेय हे जणू उपमानच आहे ही रचना असणारा हा अलंकार असतो. हे दाखवण्यासाठी जणू वाटे गमे हे शब्द वापरतात.

उदा.

 • त्याची नजर म्हणजे जणू तलवारच 

अपन्हुती – 

उपमेय लपवून ते उपमानच आहे असे भासवले जाते तेव्हा अपन्हुती अलंकार घडतो.

उदा.

 • हे पाणी नाही अमृतच आहे.

अनन्वय – 

ज्या वेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाचीही होऊ शकत नाही तेव्हा ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार घडतो.

उदा.

 • आईसारखीच आई
 • आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्यापरी

रूपक – 

जेव्हा उपमेय आणि उपमान यांत फरक नसून दोन्ही एकच आहे असे दाखवले जाते तेव्हा रूपक अलंकार असतो.

उदा.

 • देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर
 • वाघिणीचे दूध प्याले, वाघबच्चे फाकडे

अतिशयोक्ती – 

एखादी कल्पना आहे त्यापेक्षा जास्त फुगवून सांगितली जाते तिथे अतिशयोक्ती हा अलंकार असतो.

उदा.

 • ती रडली समुद्रच्या समुद्र
 • एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली

दृष्टांत – 

एखादा विषय पटवून देण्यासाठी जेव्हा उदाहरणे आणि दाखले दिले जातात तेव्हा तिथे दृष्टांत अलंकार असतो

 • लहानपण देगा देवा,मुंगी साखरेचा रवा 

ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार

विरोधाभास –

 दिसायला विरोध असणे पण प्रत्यक्षात विरोध नसणे हे विरोधाभास अलंकाराचे लक्षण आहे.

उदा.

 • जरी मी आंधळी तुला पाहते
 • मरणात खरोखर जग जगते

चेतनागुणोक्ती – 

निर्जीव गोष्टी जेव्हा सजीवांप्रमाणे कृती करतात असे भासवले जाते तेव्हा तिथे चेतनागुणोक्ती अलंकार होतो

उदा

 • डोकी अलगद घरे उचलती

काळोखाच्या उशीवरून

अर्थान्तरन्यास – 

विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढून ती गोष्ट पटवून दिल्या जाते तेव्हा तिथे अर्थान्तरन्यास अलंकार घडतो.

उदा.

 • कठीण समय येता कोण कामास येतो?

स्वभावोक्ती – 

या अलंकारात कोणत्याही प्राणी स्थळ किंवा वस्तूचे किंवा प्रसंगाचे अतिशय हुबेहूब वर्णन केलेले असते.

उदा.

 • गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी म्हणायचा आणि अन मनाशीच की – जागेवर बांधीन माडी

व्याजस्तुती – 

बाहेरून स्तुती केलेली असते पण आतून निंदा असते किंवा आतून निंदा केलेली असते पण बाहेरून स्तुती दिसते तेव्हा तिथे व्याजस्तुती हा अलंकार असतो

उदा.

 • होती वदन चंद्राच्या दर्शनाचीच आस ती , अर्धचंद्र तू द्यावा कृपा याहून कोणती?

पर्यायोक्ती – 

एखादी गोष्ट सरळ न सांगता वेगळे शब्दाची रचना करून सांगितली जाते तेव्हा तिथे पर्यायोक्ती अलंकार असतो.

उदा.

 • तो सध्या बिना भाड्याच्या खोलीत राहतो.

सार – 

एखादी कल्पना चढत्या क्रमाने मांडून तिच्या सर्वोच्च बिंदूवर नेली जाते किंवा एखादी कल्पना उतरत्या क्रमाने मांडत जाऊन सर्वात खालच्या स्तरावर नेली जाते तेव्हा सार हा अलंकार घडतो.

उदा.

 • आधीच मर्कट तशातही मद्य प्याला झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला

अन्योक्ती –

दुसऱ्याला उद्देशून तिसऱ्या व्यक्तीला उद्देशून बोलणे म्हणजे अन्योक्ती होय

उदा.

 • येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करिशी अनेक

ससंदेह – 

जेव्हा वाक्यात उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संशय निर्माण होतो तेव्हा ससंदेह अलंकार असतो

उदा.

 • हा दोरखंड आहे की साप? 

भ्रांतीमान – 

उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भास जेव्हा निर्माण होतो तेव्हा तो भ्रांतीमान अलंकार असतो. 

 • पलाशपुष्प मानोनि शुकचंचू मध्ये अलि तोही जांभूळ मानोनी, त्यास चोचीमध्ये धरी

व्यतिरेक – 

उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवल्या जाते तिथे व्यतिरेक हा अलंकार घडतो.

उदा.

 • अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
 • कामधेनुच्या दुग्धहूनही ओझ हिचे बलवान

या प्रकरणावर आधारित खालील टेस्ट सोडवा आणि तुमचा किती अभ्यास झाला आहे हे बघा


किती मार्क्स मिळाले मित्रांनो ? तुमचे मार्क्स पटापट कंमेंट करून सांगा – बघू कोणाचा किती अभ्यास झाला आहे ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!